CoronaVirus News Marathi : America moderna coronavirus vaccine high cost
CoronaVirus News : अमेरिकन कंपनीची कोरोनाची लस खिशाला कात्री लावणार; जाणून घ्या किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 01:06 PM2020-07-29T13:06:20+5:302020-07-29T13:46:06+5:30Join usJoin usNext संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या माहमारीतून बाहेर येण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. फायनंशियल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील कंपनी मॉडर्ना इंक लस तयार केल्यानंतर एका कोर्ससाठी ३ हजार ७०० रुपयांपासून ४ हजार ५०० रुपयांपर्यंत खर्च वसूल करेल अशी योजना आखली जात आहे. फायजर कंपनी आणि बायोटेक कंपनीच्या तुलनेत मॉडर्ना लसीची किंमत खूप जास्त आहे. जवळपास ८०० रुपयांनी अधिक किंमत मोजावी लागणार आहे. मॉडर्ना कंपनीच्या लसीच्या दोन डोससाठी जवळपास ३ हजार ७०० ते ४ हजार ५०० इतका खर्च लागू शकतो. अमेरिकेतील फायजर कंपनी आणि जर्मन कंपनी यांनी कोरोनाची लस तयार करण्यासाठी १५ हजार कोटींचा व्यवहार केला आहे. याद्वारे ५ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच लस दिली जाणार आहे. रिपोर्टनुसार अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीकडून जास्त लोकसंख्या असलेल्या देशात ३ हजार ७०० ते ४ हजार ५०० रुपये वसूल करण्याचा विचार केला जात आहे. प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या वितरणासाठी अमेरिकन सरकारद्वारे चर्चा सुरू करण्यात आली आहे. प्रवक्त्यांनी गोपनियता ठेवत किमतीबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार मॉडर्ना कंपनीच्या कोरोना व्हायरसच्या लसीची किंमत निश्चित होणं अजूनही बाकी आहे. कंपनीने दिलेल्यामाहितीनुसार पूर्णपणे खर्च भरून निघेल अशी लसीची किंमत ठेवण्यात येणार आहे. . तेच जॉनसन एँड जॉनसन नॉट-फॉर-प्रॉफिट या तत्वावर लसीची विक्री करण्याचा विचार करत आहेत. ब्रिटिश स्विडिश कंपनी एस्ट्राजेनका ने जवळपास ९ कोटी रुपयांना अमेरिकेला ३० कोटी लस पुरवण्याचा करार केला आहे. त्यामुळे एक्स्ट्राजेनका या लसीच्या प्रत्येक डोजची किंमत ३०० रुपयांपर्यंत असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने लस तयार करण्याासठी ऑपरेशन वार्प स्पीड प्रोग्राम सुरू केला आहे. मॉडर्ना कंपनीची लस तयार करण्यासाठी सरकारकडून ७ हजार ४७६ रुपयांचा फंड देण्यात आला आहे. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सकोरोना वायरस बातम्याअमेरिकाHealthHealth Tipscorona virusAmerica