कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी अश्वगंधाची होणार क्लिनीकल टेस्ट, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 04:41 PM2020-05-09T16:41:30+5:302020-05-09T17:11:09+5:30

कोरोना व्हायरसरला रोखण्यासाठी आयुष मंत्रालय आयुर्वेदाच्या चार औषधांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर चाचण्या घेणार आहे. ज्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे किंवा जास्त जोखीम असलेल्या रुग्णांच्या नमुन्यांवर हा अभ्यास सुरू आहे.अश्वगंधा, गुडूची (गुलबेल) पीपली, मुलठी, आयुष 64 या चार औषधांवर संशोधन सुरू आहे. या औषधांद्वारे चाचण्या केल्या जातील.

कोरोना व्हायरच्या महामारीचा प्रसार वाढत असताना इतर औषधं आणि अश्वगंधा यात तुलना केली जाणार आहे. अश्वगंधा अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. यातील अनेक औषधी गुणधर्मामुळे अनेक आजारांवरील औषधांमध्ये अश्वगंधाचा वापर केला जातो. त्यामुळे झोपेच्या समस्येपासून डायबिटीसच्या समस्येपर्यंत सगळ्या समस्या कमी होतात. आज आम्ही तुम्हाला अश्वगंधा या औषधी वनस्पतीचे फायदे सांगणार आहोत.

झोपेची समस्या : एका रिसर्चनुसार अश्वगंधाच्या सेवनाने झोपसंबंधी समस्या दूर होतात. कारण अश्वगंधाच्या पानांमध्ये ट्रायथिलीन ग्लायकोल हा घटक असल्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.

ताण-तणाव दूर होतो : सध्या जीवनशैलीत ताण तणावांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. अश्वगंधामध्ये असलेल्या सिटोइंडोसाईड आणि एसाईलस्टरीग्लुकोसाईड्स हे दोन्ही घटक शरीरामध्ये अँटिस्ट्रेस गुणाचे काम करतात. यामुळे तणावापासून सुटका मिळवता येते.

मधूमेह: जसजसं वय वाढत जातं. तसं आरोग्याच्या समस्या उद्भवतात. मधूमेहाच्या रुग्णांसाठी अश्वगंधा फायदेशीर ठरतं. त्यातील हायपोग्लायमिक गुण ग्लुकोजचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते : कोरनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगलं असणं आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजार दूर राहतात. प्रतिकारशक्ती अधिक चांगली करण्यासाठी अश्वगंधाचा फायदा होतो. याचं सेवन नियमित केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

वजन वाढण्यावर नियंत्रण : अश्वगंधाचं सेवन केल्यास, भूकेवर व्यवस्थित नियंत्रण राहतं आणि जास्त प्रमाणात भूक लागत नाही. बऱ्याचदा तणाव आणि चिंतेमुळेही जास्त भूक लागते. पण तणाव कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि भूक न लागून पोट व्यवस्थित भरलेले जाणवून वजनावर नियंत्रण ठेवण्यास त्याची मदत होते.

कॉलेस्ट्रॉल : अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधित समस्येपासून वाचता येते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात. शरीरातील कॉलेस्ट्रॉल लेव्हव मेंटेन राहते.

अश्वगंधासारख्या अन्य औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा वापर करून कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी तसंच लोकांचा जीव वाचवण्यासाठी औषधं तयार करण्याचा प्रयोग केला जाणार आहे.