CoronaVirus News : धोका वाढला! आता फक्त 2 दिवसांत दिसतात कोरोनाची 'ही' 5 लक्षणं; रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:15 PM 2022-02-07T16:15:47+5:30 2022-02-07T16:39:29+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे नवनवीन धोकादायक रूप, व्हेरिएंट समोर येत आहेत, त्यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनत चालली आहे. जगभरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 39 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 396,343,205 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 5,759,927 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. प्रगत देश देखील हतबल झाले आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून 315,181,677 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. पण तरीदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. ज्या प्रकारे कोरोनाचे नवनवीन धोकादायक रूप, व्हेरिएंट समोर येत आहेत, त्यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनत चालली आहे.
डेल्टा आणि ओमाय़क्रॉन व्हेरिएंट सारखे कोरोनाचे नवीन प्रकार आल्यानंतर या प्राणघातक व्हायरसची लक्षणेही झपाट्याने बदलत आहेत. कोरोना येऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत. मात्र आजपर्यंत त्यावर कायमस्वरूपी इलाज नाही.
कोरोनाबाबत रोज नवनवीन संशोधन समोर येत आहे. अशाच एका रिसर्चने आता चिंता वाढवली आहे. एका नवीन रिसर्चमधून असे समोर आले आहे की, कोरोना व्हायरसची लक्षणे आता 10 किंवा 14 दिवसांत नव्हे तर दोन दिवसांत दिसून येत आहेत.
इम्पीरियल कॉलेज लंडनने कोरोना व्हायरसची लक्षणे संदर्भात DHSC आणि रॉयल फ्री लंडन NHS फाउंडेशन ट्रस्टच्या सहकार्याने हा अभ्यास केला आहे. अभ्यासादरम्यान संशोधकांच्या एका गटाने काही निरोगी लोकांना व्हायरसने संक्रमित केले.
शरीरात व्हायरसचा संसर्ग, संसर्गापासून विकासापर्यंत आणि लक्षणे सुरू होण्यापर्यंतचे बदल पाहण्यासाठी त्यांनी कालांतराने त्यांचे निरीक्षण केले. हा अशा प्रकारचा पहिला अभ्यास आहे, जो पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत संसर्ग ओळखतो.
संशोधकांना असे आढळून आले की संसर्ग घशापासून सुरू होतो आणि पाच दिवसांत त्याच्या शिखरावर पोहोचतो. हे सूचित करते की कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तोंड आणि नाक मास्कने झाकणे.
संशोधकांच्या टीमला असेही आढळून आले की लॅटरल फ्लो टेस्ट (LFT) ही कोरोना संक्रमित व्यक्ती इतर लोकांना संसर्ग प्रसारित करण्यास सक्षम आहे की नाही हे तपासण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.
ही चाचणी 36 निरोगी तसेच लसीकरण न झालेल्या सहभागींवर घेण्यात आली ज्यांना यापूर्वी कधीही व्हायरसचा संसर्ग झाला नव्हता. सहभागींचे वय 18 वर्षे ते 30 वर्षे होते. 36 सहभागींपैकी केवळ 18 सहभागींना कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि 16 जणांना सौम्य किंवा गंभीर लक्षणे आढळली.
संशोधकांचे म्हणणे आहे की ज्या रुग्णांना विषाणूची लागण झाली होती त्यांना सौम्य किंवा गंभीर लक्षणे दिसून आली. ही लक्षणे हलकी ते मध्यम विकसित झाली आहेत, ज्यात नाक वाहणं, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यांचा समावेश आहे.
सहभागींपैकी कोणालाही गंभीर संसर्ग झाला नाही. 13 लोकांनी त्यांची वास घेण्याची क्षमता कमी झाल्याची नोंद केली, जी 90 दिवसांत परत आली. संशोधकांनी सांगितले की बहुतेक रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसची फक्त सौम्य किंवा मध्यम लक्षणे दिसून आली.
कोणालाही त्यांच्या फुफ्फुसात कोणतेही बदल किंवा कोणत्याही गंभीर प्रतिकूल घटनांचा अनुभव आला नाही. कोणत्याही संभाव्य दीर्घकालीन प्रभावांचे निरीक्षण करण्यासाठी सर्व सहभागींचे 12 महिने निरीक्षण केले जाईल.
संशोधनात असं म्हटलं आहे की तोंड आणि नाक दोन्ही झाकण्यासाठी योग्य फेस मास्क वापरा. संशोधकांच्या टीमला असेही आढळून आले की लॅटरल फ्लो टेस्ट (LFT) हा विषाणूने संक्रमित व्यक्ती इतर लोकांना संसर्ग प्रसारित करण्यास सक्षम आहे की नाही हे तपासण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वेगाना पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे.