खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 10:44 AM 2020-07-14T10:44:16+5:30 2020-07-14T11:14:45+5:30
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार पसरवला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाच्या माहामारीचा फटका संपूर्ण जगभरातील देशांना बसत आहे. ही माहामारी पसरण्याला चीन जबाबदार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे २ तज्ज्ञ कोरोना विषाणूंचा प्रसार नेमका कसा आणि कुठून झाला याची तपासणी करण्यासाठी चीनला रवाना झाले आहेत.
याबाबत चीनच्या विदेश मंत्रालयचे प्रमुख हुआ चूनयिंग त्यांना कल्पना देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ कोरोना विषाणूंच्या मुळ स्त्रोताबाबत माहिती घेण्यासाठी या ठिकाणी जाणार आहेत.
सीजीटीएननी दिलेल्या रिपोर्टनुसार चीनचे तज्ज्ञ WHO च्या तज्ज्ञांची मदत करणार असून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार WHO च्या तज्ज्ञांनी इतर देशांचाही दौरा करायला हवा.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार WHOने सांगितले की कोरोना व्हायरसचे मुळ स्त्रोत शोधण्यासाठी अनेक देशांना सामिल करून घेण्यात येईल किंवा त्या देशांचा दौरा केला जाईल.
आतापर्यंत केलेल्या संशोधनातून कोरोना व्हायरस हा प्राण्यांपासून माणसांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. अनेक रिपोर्टमधून चीनच्या वुहानमधील जनावरांच्या बाजारातून हा व्हायरस पसरल्याचे सांगितले जात आहे.
जागितक आरोग्य संघटनेने प्रमुख टेड्रोस एडहानॉम त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या मुळ स्त्रोताला शोधणं खूप महत्वाचं आहे. कारण याबाबत माहिती मिळाल्यास आपण ही लढाई उत्तमरित्या लढू शकू.
२०१९ मध्ये चीनने हा व्हायरसच्या प्रसाराबाबत धोक्याची सुचना दिली होती. तरीही अमेरिकेसह इतर देशांकडून चीनला व्हायरसच्या प्रसाराबाबत कारणीभूत मानलं जात आहे.