Omicron Variant : संकटं संपता संपेना! ओमायक्रॉन आता पाठ सोडेना; 'या' नव्या लक्षणांनी पुन्हा एकदा वाढवली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 04:14 PM2022-02-14T16:14:50+5:302022-02-14T16:45:33+5:30

Omicron Variant : ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, त्यामुळे संसर्गाचे निदान करणे कधीकधी कठीण असते, ज्यामुळे उपचारास विलंब होतो.

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 3 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 34,113 नवे रुग्ण रुग्ण आढळले आहेत. तर 346 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या देशात कोरोनाच वेग मंदावताना पाहायला मिळत आहे.

नव्या रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट पाहायला मिळत असून मृतांचा आकडा देखील कमी झाला आहे. मात्र धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रभाव सध्या कमी होताना दिसत नाही.

जरी Omicron ची लक्षणे अतिशय सौम्य असली तरी तो खूप वेगाने पसरत आहे आणि त्याची लक्षणे देखील खूप वेगाने बदलत आहेत. ओमायक्रॉन पाठ सोडत नसल्याचं आता समोर आलं आहे. पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.

ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, त्यामुळे संसर्गाचे निदान करणे कधीकधी कठीण असते, ज्यामुळे उपचारास विलंब होतो. सामान्य लक्षणे वाढत आहेत. यामुळे सतर्क असणं गरजेचं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ओमायक्रॉनची पहिली प्रकरणे नोंदवली गेली, तेव्हा रुग्ण देखील स्नायू दुखण्याची तक्रार करत होते. वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगभरात ओमिक्रॉनची प्रकरणे वाढत असताना, बहुतेक रुग्णांना नाक वाहणं, अंगदुखी, छातीत दुखणे, पाठदुखी आणि थकवा यासह तीव्र स्नायू दुखणे यासारखी सौम्य लक्षणे जाणवली आहेत.

आकडेवारीनुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये, ओमायक्रॉन संसर्गामुळे श्वसन समस्या देखील उद्भवत नाहीत. जर तुम्हाला सर्दी-खोकल्यासोबत पाय किंवा शरीरात दुखणे यासारखी विचित्र लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही ताबडतोब तपासणी करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

ओमायक्रॉन असल्यास शरीरातील दोन ठिकाणी जास्त त्रास होतो. हे दोन भाग म्हणजे पाय आणि खांदे. यूके झो कोविड स्टडी अॅपनुसार, गेल्या दोन वर्षांत असे दिसून आले आहे की कोरोना विषाणू शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो.

जर आपण ओमायक्रॉनबद्दल बोललो तर यामध्ये रुग्णांचे पाय आणि खांदे सर्वात जास्त प्रभावित होतात. ज्या लोकांना ओमायक्रॉन आहे ते स्नायू दुखण्याची तक्रार करतात, त्याचा सर्वाधिक परिणाम हा पाय आणि खांद्यावर जाणवतो.

ओमायक्रॉनमुळे होणारी वेदना वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकते. तुम्ही बरे होईपर्यंत ती असते. काही रुग्णांना त्यांच्या पायात सुन्नपणा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. खांद्याच्या बाबतीत रुग्णांना मुख्यतः वेदना, जडपणा, सुन्नपणा जाणवला.

पाय आणि खांद्यामध्ये कमकुवतपणा देखील ओमायक्रॉनचे लक्षण असू शकते. तज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा व्हायरस मस्कुलोस्केलेटल सिस्टमवर परिणाम करतो तेव्हा त्याचा सामान्यतः स्नायू, हाडे आणि सांधे प्रभावित होतो, ज्यामुळे वेदना होतात.

जरी ओमायक्रॉनच्या बाबतीत शरीर साधारण दुखत असलं तरी ते व्हायरल संसर्गाच्या मुख्य पाच लक्षणांपैकी एक मानलं जात नाही. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे भारतातही रुग्ण आढळून आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एका व्यक्तीला एकदा, दोनदा नाही तर तब्बल 78 वेळा कोरोना झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तुर्कस्तानातील एक व्यक्ती गेल्या 14 महिन्यांत 78 वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे.

वर्षभरापासून तो आयसोलेशनमध्येच आहे. 56 वर्षीय मुझफ्फर कायासन यांना नोव्हेंबर 2020 साली पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

काही दिवसांनी त्याच्यातील कोरोना लक्षणं कमी झाली. पण जेव्हा पुन्हा कोरोना टेस्ट केली तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला नाही. 78 वेळा त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. पण प्रत्येक वेळेला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हच येत आहे.