Coronavirus: ‘या’ ठिकाणी कोरोना लसीच्या अंतिम टप्प्याची चाचणी सुरु; लवकरच लोकांना उपलब्ध होणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 08:40 AM 2020-07-20T08:40:27+5:30 2020-07-20T08:44:10+5:30
कोरोना विषाणूच्या लसीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी यूकेच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून येऊ शकते. विद्यापीठ लसीच्या सुरुवातीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा जाहीर करणार आहे.
आतापर्यंतच्या प्रगतीत सर्वात पुढे असणाऱ्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी-अॅस्ट्रॅजेनेकाची लस मिळविण्यासाठी बऱ्याच देशांनी आधीच करार केला आहे. दुसरीकडे, अमेरिकन कंपनी मॉडर्ना देखील क्लिनिकल चाचणीचा शेवटचा टप्पा सुरू करणार आहे.
चीनच्या २ लसीची वेगवेगळ्या देशात तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरु आहे. भारतात बनत असलेल्या Covaxin आणि Zycov-D या दोन कोरोना लसीवर मानवी चाचण्याही सुरू आहेत.
याव्यतिरिक्त, बर्याच भारतीय कंपन्यांचा वेगवेगळ्या देशांमध्ये लसीच्या चाचण्यांमध्ये समाविष्ट आहे. अमेरिकन कंपनी मॉडर्नाची कोविड -१९ लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
अलीकडील अभ्यासामध्ये, लसीने क्लिनिकल चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दिले आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व ४५ व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज तयार करण्यात आले. फेज ३ चाचणीमध्ये ३० हजार रुग्णांचा समावेश असेल, यातील अर्ध्यांना १०० मायक्रोग्राम डोस दिले जातील तर बाकींना प्लेसीबो दिलं जाईल.
Clinicaltrials.gov नुसार ही अभ्यास चाचणी २७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालेल. मॉडर्नाची लस ही जगातील सर्वात प्रगत लसींपैकी एक आहे.
बांग्लादेश मेडिकल रिसर्च कौन्सिलने (बीएमआरसी) चिनी कंपनीने बनविलेल्या कोविड लसीच्या फेज ३ च्या चाचणीस मान्यता दिली आहे. सात रुग्णालयांमध्ये ऑगस्ट महिन्यांपासून चाचणी सुरू होईल.
सिनोव्हॅक रिसर्च एँण्ड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड या चिनी कंपनीने ४२०० आरोग्य कर्मचारी तयार केले आहेत. त्यांची फेज १ आणि २ चाचण्या चीनमध्ये घेण्यात आल्या आहेत.
रशियाच्या लसीने चाचणीच्या स्पर्धेत बाजी मारल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता तेथील आरोग्यमंत्र्यांनी असं म्हटले आहे की, तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी होण्यापूर्वीच ते ही लस लोकांपर्यंत पोहोचवू शकतात.
रशिया दोन प्रकारची लसीची फेज ३ मधील चाचणी ३ ऑगस्टपासून रशिया तसेच युएईमध्ये सुरू होणार आहे. भारतातही कमीत कमी ७ कंपन्या कोरोनावरील लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे.