Coronavirus : दीड वर्षं नाही; कोरोनावरची लस 'या' महिन्यात येईल; ऑक्सफर्डच्या प्रोफेसरनं दिली खूशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:40 PM2020-04-18T12:40:31+5:302020-04-18T13:58:20+5:30

कोरोनाच्या सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत ब्रिटनचा समावेश आहे. इथेही वैज्ञानिक कोरोनावर उपायाचा शोध घेत आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरात महामारी पसरली आहे. या व्हायरसची लागण जगभरातील 22 लाखांपेक्षा जास्त लोकांना झाली असून दीड लाखांपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. वेगवेगळ्या देशामध्ये या आजारावर उपाय शोधले जात आहेत. कोरोनाच्या सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत ब्रिटनचा समावेश आहे. इथेही वैज्ञानिक कोरोनावर उपायाचा शोध घेत आहेत.

in.reuters.com ने दिलेल्या वृत्तानुसार, आता ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयातील वॅक्सीनोलॉजी विभागाच्या प्राध्यापिक सारा गिल्बर्ट यांनी कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार केल्याचा दावा केला आहे. (रॉयटर्सने दिलेली माहिती : https://in.reuters.com/article/us-health-coronavirus-vaccine-oxford/uk-scientists-to-make-a-million-potential-covid-19-vaccines-before-proof-idINKBN21Z25M)

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना गिलबर्ट यांनी वॅक्सीन सप्टेंबरपर्यंत बाजारात येणार असल्याचा दावा करत सांगितले की, आम्ही महामारीचं रूप घेणाऱ्या या आजारावर काम करत होतो, ज्याला आम्ही एक्स नाव दिलं होतं. यासाठी आम्हाला योजना बनवून काम करण्याची गरज होती. (Image Credit : medicalnewstoday.com)

गिलबर्ट यांनी सांगितले की, याचे क्लिनिकल ट्रायल सुरू झाले आणि यात यश मिळणार. तसेच एक मिलियन डोज याचवर्षी सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होतील असेही त्या म्हणाल्या.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमला या वॅक्सीनबाबत इतका आत्मविश्वास आहे की. क्लीनिकल ट्रायलआधीच याची मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली आहे. याबाबत प्राध्यापक एड्रियन हिल म्हणाले की, टीमला फार विश्वास आहे.

त्यांना सप्टेंबरपर्यंत वाट बघायची नाहीय. आम्ही धोका पत्करून वॅक्सीनचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आहे. जगातल्या एकूण 7 मॅन्युफॅक्टररर्ससोबत मिळून याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे.

प्राध्यापक हिल म्हणाले की, 7 मॅन्युफॅक्चरर्सपैकी तीन ब्रिटन, दोन यूरोप, एक चीन आणि एक भारतातील आहे. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की यावर्षी सप्टेंबर किंवा वर्षाच्या शेवटपर्यंत या वॅक्सीनचे एक मिलियन डोज उपलब्ध होती.

ते म्हणाले की, तीन टप्प्यात ट्रायलची सुरूवात 510 वॉलेंटिअर्ससोबत झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 5 हजार वॉलेंटिअर्स जोडले जातील अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, या वॅक्सीनचा शोध लावण्यात बिझी असलेल्या प्राध्यापिका गिलबर्ट यांच्या टीमला ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च आणि द यूके रिसर्च अॅन्ड इनोव्हेशनने 2.2 मिलियन पाउंडचं अनुदान दिलं आहे.