Coronavirus : Oxford vaccine scientists ethics debate infecting volunteers
चिंताजनक! ऑक्सफर्डची कोरोना लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत; लसींबाबत २ तज्ज्ञांमध्ये मतभेद, जाणून घ्या कारण By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 12:27 PM2020-08-09T12:27:30+5:302020-08-09T12:48:42+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोनाची लस कधी येणार याची संपूर्ण जगभरातील लोकांना प्रतिक्षा आहे. अशा स्थितीत कोरोना लसीवरून दोन शास्त्रज्ञांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. लसीच्या चाचणी प्रक्रियेवरून हे दोन शास्त्रज्ञ एकमेकांशी सहमत नाहीत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची कोरोनाची लस शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. डेलीमेलनं दिलेल्या माहितीनुसार प्राध्यापक एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यात लसीवरून वाद सुरू आहे. प्रोफेसर अॅड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यात एखाद्या चाचणीसाठी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित करायचे की नाही यावरून वाद सुरू आहे. प्रोफेसर अॅड्रियन हिल यांनी निरोगी स्वयंसेवकांना कोरोनानं संक्रमित करावे, असे सांगितले होते. दरम्यान कोरोनाच्या लसीची चाचणी यशस्वी तेव्हाच समजली जाते जेव्हा, लस वापरणारे बहुतेक लोक कोरोनाच्यासंपर्कात आले तरी त्यांना त्याची लागण होणार नाही. एकीकडे ब्रिटनमध्ये रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, अशा परिस्थितीत चाचणी यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. याआधी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी ठरवलं होतं , काही स्वयंसेवक ज्यांना लस दिली जात आहे, ते स्वत: येत्या काळात व्हायरसच्या संपर्कात येऊ शकतात. मात्र आता प्रोफेसर अॅड्रियन हिल यांना काही स्वयंसेवकांना कोरोना संक्रमित करून लसीची चाचणी करायची आहे. डेली मेलच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट या अॅड्रियन हिल यांच्याशी मताशी सहमत नाहीत. जर शास्त्रज्ञ स्वयंसेवकांना कोरोनाला संक्रमित करतील तर, लसीच्या चाचणीचे निकाल लवकर येऊ शकतात. मात्र यावर दोन्ही तज्ज्ञांचे एकमत असेल तेव्हाच चाचणी पूर्ण करता येऊ शकेल, चाचणीच्या प्रस्तावाला एनएचएसकडून मान्यता मिळेलही पण या दोन्ही शास्त्रज्ञांनी अधिकृतपणे यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याआरोग्यCoronaVirus Positive NewsHealth