coronavirus problems after recovery post covid guillain barri syndrome
कोरोनामुक्त रुग्णांना जीवघेण्या 'गुलियन बेरी सिंड्रोम'चा धोका; जाणून घ्या लक्षणं By कुणाल गवाणकर | Published: December 25, 2020 09:21 AM2020-12-25T09:21:17+5:302020-12-25T09:24:30+5:30Join usJoin usNext जगातील कोरोना रुग्णांचा आकडा ८ कोटींच्या जवळ पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १७ लाखांच्या पुढे गेला आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली आहे. यातील ९७ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये कोरोनावर मात केलेल्या १० जणांमध्ये 'गुलियन बेरी सिंड्रोम'ची लक्षणं दिसून आली आहेत. यामुळे रुग्णांना अर्धांगवायूचा त्रास होतो. गुलियन बेरी सिंड्रोम एक गंभीर स्वरुपाचा आजार आहे. विषाणूची लागण झाल्यानंतर हा आजार होतो. मात्र हा आजार एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. गुलियन बेरी सिंड्रोम दुर्मिळ आजार आहे. तो एक लाखामागे एका व्यक्तीला होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना गुलियन बेरी सिंड्रोम होण्याची शक्यता अधिक असते. प्लाझ्मा फोरेसिस मशीनच्या माध्यमातून गुलियन बेरी सिंड्रोमवर उपचार केले जातात. योग्य वेळी उपचार न झाल्यास रुग्णाचा जीवदेखील जाऊ शकतो. गुलियन बेरी सिंड्रोमचा त्रास सुरू झाल्यावर सुरुवातीला हात, पायांमध्ये कमजोरी जाणवू लागते. त्यानंतर हळूहळू कंबर, खांदे दुखू लागतात. गुलियन बेरी सिंड्रोमचा त्रास वाढल्यास श्वास घेण्यात अडचणी येतात. रुग्णाला पाच-दिवस रोज एक इंट्राविनस इम्युनोग्लोबिलिन इंजेक्शन दिलं जातं. त्याची किंमत अतिशय जास्त आहे. दररोज व्यायाम, योग केल्यास, चालल्यास, पौष्टिक आहार घेतल्यास गुलियन बेरी सिंड्रोमपासून बचाव करता येतो.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus