CoronaVirus : Russia first covid 19 vaccine not in advanced test stages says who
यशस्वी लसीच्या दाव्यावरून WHO नं केली रशियाची पोलखोल; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:31 PM2020-08-14T15:31:11+5:302020-08-14T15:44:03+5:30Join usJoin usNext रशियानं कोरोना व्हायरसची नवीन लस यशस्वीरित्या तयार केल्याचा दावा केला आहे. पण जागितक आरोग्यं संघटनेच्या तज्ज्ञांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या लसीबाबात संशय व्यक्त केला आहे. WHO च्या मते रशियाच्या लसीचा एडवांस स्टेज टेस्टिंगच्या लसींमध्ये समावेश नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सद्वारे ज्या नऊ लसींना सहभागी करून घेतलं आहे. त्यात रशियाच्या लसीचा उल्लेख नाही. कोवॅक्सच्या माध्यामातून कोणताही देश लस लवकरात लवकर लस तयार करण्याासाठी निवेदन करू शकतो. तसंच गरिब देशांना लसीसाठी आर्थिक मदत सुद्धा केली जाऊ शकते. WHO चे वरिष्ठ सल्लागार ब्रुस आयलवर्ड यांनी सांगितले की, आम्ही रशियाच्या लसीवर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कारण त्यासाठी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. सध्या आम्ही रशियाकडून लसीबाबत माहिती मिळवत आहोत. WHO नं याआधीसुद्धा रशियाला लसीबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी कोरोनाची लस देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी मिळाली असल्याचे म्हटले होते. या लसीचे शेवटच्या टप्प्यातील ट्रायल अजूनही पूर्ण झालेलं नाही.तरीही ही लस कमीतकमी दोन वर्षांपर्यंत लोकांना कोरोनापासून वाचवण्याचं काम करू शकते असा दावा रशियानं केला आहे. रशियाच्या लसीवर संपूर्ण जगभरातील अनेक देशांनी संशय व्यक्त केला आहे. जर्मनीचे आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या लसीच्या चाचण्या योग्य पद्धतीनं करण्यात आलेल्या नाहीत. ही लस धोकादायक ठरू शकते. तसंच मृत्यूंचा धोकाही नाकारता येणार नाही असे त्यांनी सांगितले. युरोपातील प्रसिद्ध तज्ज्ञ इसाबेल इमबर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार या माहामारीवर उपचार शोधणं कठीण होऊ शकतं. अमेरिकेतील प्रमुख संक्रामक रोग शास्त्रज्ञ एंथन फाउची यांनी लसीवर संशय व्यक्त केला आहे. मॉस्कोतील एसोसिएशन ऑफ क्लिनिकल ट्रायल ऑर्गेनाइजेशन (Acto) ने आरोग्य मंत्रालयाला जोपर्यंत या लसीचे परिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत परवानगी न देण्याचं आवाहन केलं आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याहेल्थ टिप्सजागतिक आरोग्य संघटनाcorona virusCoronaVirus Positive NewsHealth TipsWorld health organisation