Coronavirus : डोळ्यांच्या माध्यमातून शरीरावर हल्ला करतो कोरोना, वैज्ञानिकांना सापडलं कारण! By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 04:00 PM 2020-05-11T16:00:22+5:30 2020-05-11T16:28:45+5:30
व्हायरस ACE-2 माध्यमातून शरीरावर अटॅक करतो. ACE-2 रिसेप्टर्स फुप्फुसं, रेस्पिरेटरी ट्रॅक्टसोबतच शरीराच्या इतर अंगांमध्ये असतो. कोरोना व्हायरस डोळ्यांच्या माध्यमातून शरीरावर हल्ला करू शकतो, असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांच्या टीमने शोधलं की, डोळ्यांच्या ACE-2 रिसेप्टर्सच्या माध्यमातून व्हायरस शरीरात शिरतो.
शरीरातील सेल्स संक्रमण होण्यासाठी ACE-2 रिसेप्टर्सला गेटवे मानलं जातं. व्हायरस यांच्या माध्यमातून शरीरावर अटॅक करतो. ACE-2 रिसेप्टर्स फुप्फुसं, रेस्पिरेटरी ट्रॅक्टसोबतच शरीराच्या इतर अंगांमध्ये असतो.
असे मानले जात आहे की, याच कारणाने कोरोना व्हायरसच्या अनेक रूग्णांमध्ये Conjunctiivitis ची लक्षणेही दिसली. यादरम्यान रूग्णांचे डोळे लाल झाले होते.
वैज्ञानिकांचं असं मत आहे की, अश्रूंच्या माध्यमातूनही कोरोना व्हायरस पसरू शकतो. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांनी लिंग्ली झोऊ यांच्या नेतृत्वात कोरोना डोळ्यातून पसरतो याबाबत रिसर्च केला.
वैज्ञानिकांनी ACE -2 ला समजून घेण्यासाठी 10 मृत लोकांच्या डोळ्यांचा अभ्यास केला. या लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता.
कोरोना व्हायरस डोळ्यातून पसरण्याबाबत अनेक रिपोर्ट समोर आल्यानंतर वैज्ञानिकांनी हा रिसर्च सुरू केला होता.
याआधी करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आले होते की, कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या डोळ्यातून अनेक आठवड्यांपर्यंत कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका कायम राहतो.
टेस्ट दरम्यान संक्रमणाच्या साधारण 21 दिवसांनंतरही एका महिलेच्या डोळ्यात व्हायरस आढळले होते.