CoronaVirus : Take precautions in the kitchen while cooking take care of special things MYB
CoronaVirus :स्वयंपाकघरातील 'या' चुकांमुळे होऊ शकता कोरोनाचे शिकार, 'असा' करा बचाव By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 12:12 PM2020-04-12T12:12:49+5:302020-04-12T13:19:55+5:30Join usJoin usNext जगभरासह भारतात सुद्धा कोरोना पसरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. इतकंच नाही तर कोरोनाची लागण होऊन मृत्यू होत असलेल्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. लॉकडाऊनचं पालन करताना सुद्धा घरच्याघरी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तरंच तुम्ही कोरोनापासून स्वतःला लांब ठेवू शकता. त्यासाठी जेवण बनवण्याच्या आधी आणि बनवून झाल्यानंतर दोन्हीवेळा हात स्वच्छ धुवा. एखादी वयस्कर किंवा आजारी व्यक्ती तुमच्या घरी असेल तर त्यांच्या जवळ जाताना हात सॅनिटाईजर करा. शक्यतो लांबून बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शरीरावर एखादी जखम झाली असल्यास स्पर्श करण्याआधी आणि नंतर हात स्वच्छ धुवा. सर्दी, खोकला झाला असेल तर स्वयंपाक घरात जाताना खबरदारी घ्या. जेवण बनवत असताना मास्कचा वापर करा. भाज्या फळं, खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या. तांदूळ, डाळी स्वच्छ धुवून मगंच पदार्थ तयार करा. बाहेरून आणलेल्या फळं भाज्या आधी गरम पाण्यात भिजवून ठेवा. भाज्या कापत असताना हातात ग्लॉव्हज घाला किंवा हात स्वच्छ धुवून मगच स्पर्श करा. जर तुम्ही मासाहाराचं जेवण तयार करत असाल तर आधी मीठाच्या गरम पाण्यात भिजवून मगच तयार करा. कोणत्याही माध्यमातून कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्यामुळे निष्काळजीपणा करणं आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. बाजारातून सामान आणल्यानंतर घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा. हात धुण्यासाठी साबणाचा वापर केल्यास उत्तम ठरेल. बाहेरून आल्यानंतर थेट घरातील कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. (image credit-The asian telegraph)टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusCoronavirus in Maharashtra