Coronavirus : एक नाही तर तीन प्रकारचा आहे कोरोना व्हायरस, 'हा' आहे सर्वात जीवघेणा प्रकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 04:19 PM2020-04-13T16:19:43+5:302020-04-13T16:55:53+5:30

कोरोना व्हायरसच्या या तिन्ही प्रकारांना टाइप-ए, टाइप-बी आणि टाइप-सी कॅटेगरीत ठेवण्यात आलं आहे. आता यातील सर्वात घातक कोणता प्रकार आहे हे जाणून घेऊ...

जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरसबाबत एक फारच महत्वाची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. वैज्ञानिकांना एका रिसर्चमधून असं समजलं की, कोरोना व्हायरस केवळ एकप्रकारचा नाही तर 3 प्रकारचा आहे.

कोरोना व्हायरसच्या या तिन्ही प्रकारांना टाइप-ए, टाइप-बी आणि टाइप-सी कॅटेगरीत ठेवण्यात आलं आहे. आता यातील सर्वात घातक कोणता प्रकार आहे हे जाणून घेऊ...

कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी डिसेंबरपासून ते यावर्षीच्या मार्चपर्यंत या इन्फेक्शनची जेनेटिक्स हिस्ट्री हुडकून काढली. ज्यात या व्हायरसचे तीन प्रकार असल्याचे समोर आले आहे.

वैज्ञानिकांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, यातील टाइप-ए व्हायरस आधी खवल्या मांजरासारख्या एखाद्या प्राण्यातून वटवाघळात पसरला. त्यानंतर व्हायरस वुहानच्या मांस मार्केटमधून वुहानमधील लोकांमध्ये पोहोचला.

चीनमध्ये लोकांना शिकार केल्यावर व्हायरसने देशाच्या बाहेरही थैमान घातलं. जानेवारीत जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकाही या व्हायरसच्या जाळ्यात आलं.

टाइप-ए व्हायरसचे सर्वात जास्त शिकार अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये साधारण 4 लाखांपेक्षा जास्त केसेस समोर आल्या आहेत. एकट्या अमेरिकेत दोन तृतीयांश लोक टाइप-ए व्हायरसने संक्रमित झाले आहेत.

वैज्ञानिकांचं असं मत आहे की, टाइप-बी या व्हायरसचं सर्वात घातक रूप आहे. जगात महामारीसाठी व्हायरसचा हाच प्रकार जबाबदार आहे. ब्रिटनचे डॉक्टर पीटर फॉस्टर यांच्या टीमला असं आढळून आलं की, टाइप-बी व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे.

टाइप-बी ने चीनमध्ये हजारो लोकांचा जीव घेतल्यावर यूरोप, दक्षिण अमेरिका आणि कॅनडात थैमान घातलं. त्यानंतर हा फिनलॅंड, जर्मनी, फ्रान्स, बेल्जिअम, डेन्मार्क, ब्रिटन आणि जपानमध्ये पोहोचला.

जगभरात कोरोना व्हायरस टाइप-बी ने शिकार होणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. चीनच्या बाहेर सर्वात वेगाने पसरणारा व्हायरसही हाच आहे.

व्हायरसच तिसरा प्रकार आहे टाइप-सी. हा प्रकार टाइप-बी च्या पूर्णपणे उलट आहे. टाइप-सी ने शिकार झालेले लोक आतापर्यंत केवळ यूरोप आणि सिंगापूरमध्येच बघायला मिळाले.

जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेली साडे आठरा लाखांपेक्षा जास्त केसेस समोर आली आहेत. तर एक लाखांपेक्षा जास्त लोकांना याने जीव घेतला आहे. अजूनही याचं थैमान थांबत नाहीये आणि अजूनही याला थांबवण्याचा ठोस उपाय सापडलेला नाहीये. (Image Credit : time.com)