CoronaVirus: These items must be in the fridge in the lockdown myb
CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये फ्रिजमध्ये 'या' ९ गोष्टी असायलाच हव्यात.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 05:11 PM2020-03-26T17:11:32+5:302020-03-26T17:43:26+5:30Join usJoin usNext सध्या संपूर्ण भारतभरात कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून वाचता यावं यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये कोणत्याही नागरिकाला महत्वाचं कारण असल्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. त्या वस्तू तुमच्या स्वयंपाक घरात असायलाच हव्यात. कारण कधीही कोणत्याही वस्तूंची कमतरता भासण्यापेक्षा तुम्ही आधीच काही वस्तू फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हे धान्य आपल्या आहारात प्रामुख्याने असतात. शिवाय यात फायबर्स सुद्धा असतात. ज्यामुळे तुमची पाचनक्रिया व्यवस्थित राहत असते. त्यामुळे आपल्या घरी हे पदार्थ जास्तीचे आणून ठेवा. जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. बटाटा, रताळे, गाजर अशा भाज्या खरेदी केल्यानंतर धुवून मग साठवून ठेवा. दूध किंवा दही जास्त घरात साठवून ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही दुधाला पर्याय म्हणून दूधपावडर सुद्धा आणू ठेवू शकता. फळांमध्ये केळी, सफरचंद आपलं पोट भरण्याासाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे लगेच भूक लागत नाही. त्यामुळे घरात फळं ठेवाच. कडधान्यांच्या ऊसळींचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. त्यासाठी किराणामालाच्या दुकानात मिळणारे सुके कडधान्य तुम्ही साठवून ठेवू शकता. लसूण आणि कांदा बाजारात सहज उपलब्ध होईल. कारण पदार्थाला चव येण्यासाठी आपण जेवणात मोठ्या प्रमाणावर याचा वापर करतो. पण जर तुम्ही जास्तीचं घेऊन ठेवत असाल तर फ्रिजमध्ये ठेवा. तुमची ट्रिटमेंट चालू असेल किंवा कोणतीही औषधं घेत असाल तर घरात औषध आणूनच ठेवा. संपल्यावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःची काळजी घेण्यासाठी आधीच औषध आणा. अंडी दीर्घकाळ फ्रिजमध्ये राहू शकतात. प्रोटिन्सचं मुख्य स्त्रोत अंडी आहेत. म्हणून आहारात अंड्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करा. कारण ते अनेक दिवसांपर्यंत टिकून राहू शकतं. शरीराला पोषक घटक मिळण्यासाठी उपयोगी ठरत असतात.टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सCoronavirus in Maharashtracorona virusHealth Tips