कोरोनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढवाल; आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' १० सोपे उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 12:16 PM 2020-07-22T12:16:27+5:30 2020-07-22T12:28:20+5:30
कोरोना विषाणूंची लागण झाल्यामुळे जगभरात ६ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील १ कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. आतापर्यंत कोरोनाची लस तयार झालेली नाही. कोरोनापासून बचावासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत आहेत. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या ११ उपायांबाबत सांगणार आहोत. यामुळे कोरोनाशी सामना करता येऊ शकतो.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी काढा हा खूप महत्वाचा ठरत आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यााठी तुळस, काळी मिरी, दालचीनी, सुंठ आणि मनुके यांचा काढा तयार करून प्यायला हवा.
आयुष मंत्रालयाने रोज सकाळी एक चमचा १९ ग्राम च्यवनप्राश चे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. ज्या लोकांना डायबिटिस आहे. असे लोक शुगर फ्री च्यवनप्राशचं सेवन करू शकतात.
मसाल्यांचा वापर : जेवणात रोज हळद, जीरं धणे, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. मसाल्यांच्या वापराने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
योगा : कोरोना व्हायरसप्रमाणेच इतर आजारांपासून योगा किंवा व्यायाम केल्याने दूर राहता येऊ शकतं. म्हणून घरच्याघरी १० ते २० मिनिट वेळ काढून व्यायाम करा.
गरम पाणी पिणे: आयुष मंत्रालयाशिवाय आयसीएमआरनेही दर काही वेळाने गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. आयुर्वेदात याचे अनेक फायदे आहेत. गरम पाणी प्यायल्याने जठराग्नी व्यवस्थित राहतो. त्यामुळे आजार उद्भवत नाहीत. गरम पाणी प्यायल्याने इंट्री पॉईंटवर म्हणजेच घश्यात व्हायरस आपली संख्या वाढवू शकत नाही.
हळदीच्या दुधाचं सेवन- दिवसातून एकदा किंवा दोनदा हळदीच्या दुधाचं सेवन करा. १५० ग्राम दुधात अर्धा चमचा हळद मिक्स करा. दूध शरीरासाठी फायदेशीर ठरते. हळदीत अनेक एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी व्हायरल गुण असतात. त्यामुळे व्हायरसपासून बचाव होतो.
खोकला, घश्यातील खवखव यासाठी लवंगाची पावडर आणि मध, साखर मिसळून दिवसातून दोन ते तीनवेळा सेवन करा.
नारळाचे तेल, तिळाचं तेल किंवा तुप नाकाच्या छिद्रांमध्ये लावल्यास फायदेशीर ठरेल.