कोरोनावर १०० % प्रभावी ठरणार अश्वगंधा आणि गुळवेळ; रामदेव बाबांचा दावा, जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 01:50 PM2020-06-12T13:50:59+5:302020-06-12T14:10:24+5:30

कोरोनाच्या माहामारीमुळे जगभरातील आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असेल्यांचे आणि संक्रमित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवर औषधं आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुष मंत्रालयानेही वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पतींचा कोरोनाच्या उपचारांसाठी उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान योग गुरू रामदेव बाबांनी कोरोना माहामारीचे उपचार शोधण्याचा दावा केला आहे.

टाईम्स ऑफ इंडीयाच्या रिपोर्टनुसार, आयुर्वेदिक उत्पादन कंपनी पतंजलीचे संस्थापक रामदेवबाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमीत व्यक्तीचे उपचार अश्वगंधा आणि गुळवेलाच्या साहाय्याने करता येऊ शकतात. जेव्हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीरातील अवयवांच्या संपूर्ण पेशींना संक्रमित करतो.

गुळवेळ आणि अश्वगंधा कोरोनाची चेन तोडण्यासाठी प्रभावी ठरू शकते. आता कोरोनापासून बचावसाठी या औषधी वनस्पती परिणामकारक ठरू शकतात असा दावा रामदेव बाबांनी केला आहे. आज आम्ही तुम्हाला अश्वगंधा आणि गुळवेलाचे फायदे सांगणार आहोत.

अश्वगंधाचे फायदे: रिसर्चनुसार अश्वगंधाच्या सेवनाने झोपसंबंधी समस्या दूर होतात. कारण अश्वगंधाच्या पानांमध्ये ट्रायथिलीन ग्लायकोल हा घटक असल्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. सध्या जीवनशैलीत ताण तणावांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. अश्वगंधामध्ये असलेल्या सिटोइंडोसाईड आणि एसाईलस्टरीग्लुकोसाईड्स हे दोन्ही घटक शरीरामध्ये अँटिस्ट्रेस गुणाचे काम करतात. यामुळे तणावापासून सुटका मिळवता येते.

जसजसं वय वाढत जातं. तसं आरोग्याच्या समस्या उद्भवतात. मधूमेहाच्या रुग्णांसाठी अश्वगंधा फायदेशीर ठरतं. त्यातील हायपोग्लायमिक गुण ग्लुकोजचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात.

कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगलं असणं आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजार दूर राहतात. प्रतिकारशक्ती अधिक चांगली करण्यासाठी अश्वगंधाचा फायदा होतो. याचं सेवन नियमित केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधित समस्येपासून वाचता येते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात. शरीरातील कॉलेस्ट्रॉल लेव्हव मेंटेन राहते.

गुळवेलाचे फायदे : गुळवेलांमध्ये पचनाचे विकार आणि ताण-तणाव दूर करणारे गुण आहेत. ज्यामुळे बध्दकोष्ठ, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. गुळवेलाच्या सेवनाने भूकही वाढते. ह्यामुळे तुमच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होऊन तुमचे जीवन आनंददायी होईल.

डेंग्यूसाठी गुळवेल सगळ्यात जास्त फायदेशीर ठरते. कारण या आजारात प्लेटलेट्स मोठ्या संख्येने कमी होतात. त्यामुळे तुमचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता असते. जर तुम्ही गुळवेलाच्या रसाचे सेवन केलं तर डेंग्यु होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यात येतो. रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी गिलोय फायदेशीर असतं. त्यामुळे डायबिटिस होण्यापासून रोखता येईल.

गुळवेल तुमच्या शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढवते. ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. यातील हर्ब्स तुमच्या शरीराला स्वच्छ करतात. तसंच शरीराच्या इतर भागातील हानिकारक तत्वसुध्दा दूर शरीराबाहेर टाकण्यात मदत करते.