Corona Vaccine : वॅक्सीन न घेणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, एक्सपर्ट्सनी दिला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 02:22 PM2021-07-07T14:22:46+5:302021-07-07T14:30:13+5:30

प्राध्यापक शेफनर म्हणाले की, जेव्हा व्हायरसचं म्यूटेशन होतं, तेव्हा ते आधीपेक्षा जास्त गंभीर होतं. प्रत्येक व्हायरस म्यूटेट होतो.

जगभरात वॅक्सीनेशनचं अभियान सुरू आहे. पण काही लोक असेही आहेत जे वॅक्सीन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. इन्फेक्शन डिजीज एक्सपर्ट म्हणाले की, असे लोक स्वत:चा जीव धोक्यात टाकण्यासोबतच दुसऱ्या लोकांसाठीही धोका वाढवत आहेत. कारण हे आहे की, कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट वॅक्सीन न घेतलेल्या लोकांना आधी संक्रमित करतो.

अमेरिकेतील वेंडरबिल्ट यूनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये संक्रामक रोग तज्ज्ञ प्राध्यापक विलियम शेफनर यांनी सीएनएनला सांगितलं की, वॅक्सीन न घेणारे लोक कोरोना व्हेरिएंटची चालती-फिरती फॅक्टरी आहेत. जेवढे जास्त लोक वॅक्सीन घेणार नाहीत, व्हायरसला पसरण्यासाठी तेवढी जास्त संधी मिळेल'.

प्राध्यापक शेफनर म्हणाले की, जेव्हा व्हायरसचं म्यूटेशन होतं, तेव्हा ते आधीपेक्षा जास्त गंभीर होतं. प्रत्येक व्हायरस म्यूटेट होतो. पण कधी कधी व्हायरसमध्ये अचानक होणारं म्यूटेशन याच्या संक्रमण दराला आणखी वाढवतं. व्हायरसची संक्रमणची क्षमता काही शरीरात अधिक दिसते.

व्हायरसचे कण जेव्हा वेगाने वाढतात तेव्हा कुणाला ना कुणाला संक्रमित करतात. जर तो संक्रमित व्यक्ती व्हायरसला आणखी कुणात पसरवत असेल तर त्याचं म्यूटेशन होतं. जर दुसऱ्या व्यक्तीमध्ये व्हायरसचं म्यूटेशन योग्य प्रकारे पोहोचलं तर तेव्हा तो एक व्हेरिएंट बनतो. यासाठी व्हायरसची प्रतिकृती तयार होणं गरजेचं आहे आणि वॅक्सीन न घेतलेले लोक व्हायरसला हे करण्याची पूर्ण संधी देतो.

जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे इम्यूनोलॉजिस्ट एंड्रयू पेकोज यांनी सीएनएनला सांगितलं की, 'जसे व्हायरसमध्ये म्यूटेशन होतात, तेव्हा व्हायरसला जास्तीत जास्त पसरवण्याची संधी मिळते. हे म्यूटेशन व्हायरसला आणि म्यूटेशन होण्यासाठी नवनवीन मार्ग देतो. सध्या आपल्याकडे असा व्हायरस आहे ज्याची पसरण्याची क्षमता जास्त आहे'.

वैज्ञानिकांचं मत आहे की, जे व्हायरस पसरत नाही ते म्यूटेटहीहोत नाही. सध्या जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे अल्फा, बीटा, इटा, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट थैमान घालत आहेत. या सर्वात जास्त संक्रामक डेल्टा व्हेरिएंट आहे. जो अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. भारतात दुसरी लाट याच व्हेरिएंटमुळे आली होती.

हेल्थ एक्सपर्टचं मत आहे की, केवळ वॅक्सीनच्याा माध्यमातूनच या व्हेरिएंट्स ना रोखलं जाऊ शकतं. WHO ने सांगितलं की, जेवढं जास्त आपण व्हायरसला पसरू देऊ, तेवढी जास्त त्याला बदलण्याची संधी मिळेल'.

प्राध्यापक पेकोज म्हणाले की, 'जर एखादा व्हायरस इम्यूनिटी असलेल्या व्यक्तीला संक्रमित करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो असफल होतो. किंवा फार कमी प्रमाणात संक्रमित करू शकतो. याशिवाय मजबूत इम्यून सिस्टमच्या दबावात व्हायरस प्रतिकृतीही बनवू शकत नाही. व्हायरसमध्ये तेव्हाच वेगाने बदल होतो जेव्हा त्याला पसरण्यासाठी कमजोर इम्यून सिस्टम मिळतं'.

बोस्टन कॉलेजचे बालरोग तज्ज्ञ आणि इम्यूनोलॉजिस्ट डॉक्टर फिलिप लॅंड्रिगन म्हणाले की, 'वॅक्सीन न घेणारे लोक केवळ व्हायरसचं पसरवत नाही तर याला रूप बदलण्याची संधीही देतात. वॅक्सीन न घेता प्रत्येक एक व्यक्ती व्हायरसचं एक म्यूटेशन घेऊन फिरत आहे'.