Coronavirus : 'या' महिन्यापर्यंत वॅक्सीन तयार होणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा, पण तोपर्यंत काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 02:05 PM2020-04-11T14:05:57+5:302020-04-11T14:24:27+5:30

जर या प्रयोगातून चांगले परिणाम समोर आले तर सरकार यासाठी निश्चितपणे फंड जारी करेल, याचेही संकेत आले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीमुळे आतापर्यंत जगभरात 1 लाखांपेक्षा लोकांचा जीव गेला आहे. वैज्ञानिक अनेक दिवसांपासून कोविड-19 वर वॅक्सिन शोधण्यावर काम करत आहेत. इतक्या संशोधनांनंतर आता कुठे वैज्ञानिकांना आशेची एक किरण दिसली आहे.

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये वॅक्सीनोलॉजी डिपार्टमेंटच्या प्रोफेसर साराह गिल्बर्ट यांनी दावा केला आहे की, त्यांची टीम लवकर कोरोना व्हायरसवर वॅक्सीन तयार करेल.

साराह यांनी सांगितले की, पुढील 15 दिवसांच्या आत त्यांची टीम या वॅक्सीनचा प्रयोग मनुष्यांवर करणार आहे. या वॅक्सीनबाबत ते 80 टक्के गॅरंटी घेत आहेत. (Image Credit : naidunia.com)

जर या प्रयोगातून चांगले परिणाम समोर आले तर सरकार यासाठी निश्चितपणे फंड जारी करेल, याचेही संकेत आले आहेत. जर सगळं काही ठिक झालं तर ही वॅक्सीन सप्टेंबरपर्यंत तयार होऊ शकते.

पण जेव्हा एखाद्या वॅक्सीनचं यशस्वीपणे आविष्कार होऊ शकत नाही. तोपर्यंत लोकांनी सोशल डिस्टंसिंग आणि सुरक्षित राहण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.

प्राध्यापिका साराह यांनी सांगितले की, ही वॅक्सीन यशस्वी होण्याची फार जास्त अपेक्षा आहे. याचे लवकरच काही सेफ्टी ट्रायल घेतले जातील.

साराहने सांगितले की, लॉकडाऊनमुळे ट्रायल करण्यात काही अडचणी येत आहेत. पण लॉकडाऊनमुळे कोरोनाची गति कमी झाली आहे. काही भागात तो वेगाने पसरत आहे.

दरम्यान कोरोनामुळे सर्वात जास्त फटका बसणाऱ्या देशांमध्ये ब्रिटनदेखील आहे. इथे आतापर्यंत 70 हजार केसेस समोर आल्या आहेत.

तसेच इथे कोरोनामुळे 9 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यू इटली, अमेरिका आणि स्पेनध्ये झाले आहेत.