coronavirus vaccine latest news update september covid vaccine human trial updates worldwide
खुशखबर! सप्टेंबरमध्ये येणार रशियाची लस; भारत, अमेरिकेतील कोरोनाची लस कधीपर्यंत येणार जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 09:58 AM2020-07-17T09:58:48+5:302020-07-17T10:17:37+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरातील २०० पेक्षा जास्त देशांना प्रभावित केले आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमण होत असलेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. माहामारीच्या काळात जगभरातील देशातील कोरोनाच्या लसीच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक देशात लस तयार झाली असून आता मानवी चाचणी लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे वैज्ञानिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. देशभरात कोरोनाच्या लसी कधीपर्यंत उपलब्ध होणार याबाबत आम्ही सांगणार आहोत. रशिया सेचेनोव यूनिवर्सिटी ने दावा केला आहे की त्यांची लस सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होईल. आतापर्यंत या लसीच्या सगळ्या चाचण्या सफल झाल्या आहेत. वैज्ञानिक एलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा ही लस दिल्यानंतर २ वर्षापर्यंत रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहू शकते. या लसीचा तिसरा टप्पा ऑगस्टमध्ये असेल. चाचणीचे सगळे परिणाम सकारात्मक आल्यानंतर सप्टेंबरपर्यंत लस बाजारात उपलब्ध होईल. ज्या देशामुळे कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला त्या देशाची लसही सगळ्यात पुढे आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार चीनची लस अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सिनोवॅक बायोटेक ही कंपनी लस तयार करत आहे. वुहान इंस्टीट्यूट आणि सीनाफॉर्म्सचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीची लस तयार झाल्याची माहिती समोर आली होती. ChAdOx1 nCoV-19 (AZD1222) या लसीचे परिक्षणादरम्यान सकारात्मक परिणाम दिसून आले. मानवी परिक्षणादरम्यान या लसीमुळे इम्यूनिटी विकसित झाली होती. ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटीची लस कोरोनापासून बचावासाठी प्रभावी मानली जात आहे. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आणि फार्मा कंपनी एस्ट्राजेनेका ही लस तयार करत आहे. यात भारतीय कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चाही समावेश आहे. भारतातील आयसीएमआर आणि भारत बायोटेक कंपनीने मिळून कोवाक्सिन या लसीचे मानवी परिक्षण सुरू केले आहे. या चाचणीच्या मानवी परिक्षणासाठी १४ ठिकाणी १५०० स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात आले आहेत. दिल्ली, गोवा, गोरखपुर, भुवनेश्वर, रोहतक, चेन्नई, पटना, कानपुर, विशाखापट्नम आणि हैदराबाद यांचा समावेश आहे. भारत बायोटेकच्या 'कोवाक्सिन' (COVAXIN) नंतर आता जाइडस कॅडिला हेल्थकेयर लिमिटेडनेही (DCGI) कडून मान्यता मिळाल्यानंतर आपली लस 'जायकोव- डी' चे मानवी परिक्षण सुरू केले आहे. अमेरिकेतील मॉडर्ना इंक ही कंपनी लसीचे परिक्षण करण्यासाठी पुढे आहे. २७ जुलैला अंतिम मानवी परिक्षण आहे. अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीशिवाय इनोवियो (Inovio) या कंपनीनेही लस तयार करण्याया दावा केला आहे. INO-4800 या कंपनीच्या मानवी परिक्षणात कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. सुरुवातीला ४० लोकांवर हे परिक्षण करण्यात आले होते.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याआरोग्यcorona virusCoronaVirus Positive NewsHealth