Coronavirus vaccine us and uk move closer to covid 19 vaccine by 2020 end
खुशखबर! अमेरिका, ब्रिटनची कोरोना लस २०२० च्या अखेरीस येणार, तज्ज्ञांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 10:28 AM2020-08-30T10:28:34+5:302020-08-30T11:08:42+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसमुळे जगभरातून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या लसीबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. अमेरिकेतील लसीची चाचणी अंतीम टप्प्यात पोहोचली आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या रिपोर्टनुसार सप्टेंबर २०२० च्या शेवटच्या चाचणीत कोविड १९ च्या लसीचे ४ उमेदवार आहेत. अमेरिकेचे स्वास्थ आणि मानव सेवा प्रमुख पॉल मँगो यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास या वर्षाच्या शेवटापर्यंत लस उपलब्ध होऊ शकते. पॉल मँगो यांनी पुढे सांगितले की वैद्यकिय चाचणीसाठी ३० हजार वॉलेटिअर्सना सहभागी करून घेण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त मॉडर्ना इंकनं केलेल्या दाव्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात या लसीचे न्युट्रीयालजिंग एंटीबॉडी विकसीत करण्यात आल्या. वयस्कर लोकांना ही लस दिल्यानंतर त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीत वाढ झालेली दिसून आली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या परिक्षणासाठी फक्त २० लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. अमेरिकेतील सेंटर्स आॅफ डिसिजेस कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसीपी) संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी म्हटले आहे की, जरी ही लस पुढच्या वर्षीपर्यंत तयार झाली तरी पहिले काही महिने याचा पुरवठा मर्यादित स्वरूपाचा असेल. या लसीचे वितरण समन्यायी पद्धतीने होणे आवश्यक आहे. ब्रिटेननं पूर्ण लायसेंन्स मिळण्याआधीच चाचणी प्रभावी ठरत असलेल्या लसीला आपातकालीन स्थितीत वापरासाठी परवागनी दिली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टीनं पाऊलं उचलली जात आहेत. ब्रिटेनमध्येही कोरोनाच्या लसीचे परिक्षण शेवटच्या टप्प्यात आहे. ब्रिटन सरकरानं दिलेल्या माहितीनुसार लसीचे ट्रायल पूर्ण झाल्यानंतर त्यांना लस मिळण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. प्रक्रिया सुरू केल्यास लवकरता लवकर लस उपलब्ध होऊ शकते. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआरोग्यअमेरिकाकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusHealthAmericaCoronaVirus Positive News