CoronaVirus Vaccine who should not take covishield and covaxin
Corona Vaccine: कुणी घेऊ नये कोरोना लस Covishield आणि Covaxin? एका क्लिकवर जाणून घ्या, या लशींसंदर्भात सर्व काही By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 01:12 PM2021-04-26T13:12:23+5:302021-04-26T13:22:02+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसने देशभरात हाहाकार माजवला आहे. यातच आता भारत सरकार 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांनाच लस देणार आहे. याच वेळी लोकांच्या मनात लशीसंदर्भात अनेक प्रश्न आणि काही प्रमाणात भीतीही असल्याचे दिसते. लशीच्या साइड इफेक्ट्ससंदर्भात लोक अधिक परेशान आहेत. काही बाबतीत साइड इफेक्ट्स दिसून आल्यानंतर लोकांचा मृत्यूही झाला आहे. तर जाणून घेऊया, भारतात देण्यात येणाऱ्या कोविशील्ड (covishield) आणि कोव्हॅक्सीनने (covaxin) जारी केलेल्या फॅक्टशीटसंदर्भात. ज्यात, कुठल्या लोकांनी ही लस घेऊ नये, हे सांगण्यात आले आहे. (CoronaVirus Vaccine who should not take covishield and covaxin) कोव्हॅक्सीन कुणी घेऊ नेय? - भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन तयार केली आहे. कंपनीने आपल्या फॅक्टशीटमध्ये सांगितले आहे, जर एखाद्या व्यक्तीला लशीतील कुण्या विशिष्ट इनग्रिडिएंटपासून अॅलर्जी असेल, तर त्यांनी ही लस घेऊ नये. पहिल्या डोसनंतर, जर रिअॅक्शन सामोर येत असतील अथवा घातक संक्रमण आणि अधिक ताप असेल तरीही ही लस घेऊ नये. ज्या लोकांनी एखाद्या दुसऱ्या लशीचा डोस घेतला असेल, तर त्यांनी कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेऊ नये. लस घेण्यापूर्वी हेल्थकेअरकडून सांगण्यात आलेल्या इतर गंभीर समस्यांच्याच्या बाबतीतही माहिती करू घ्या. कोव्हॅक्सीनने पूर्वी गर्भवती महिला आणि ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांनाही लस देऊ नये, असे म्हटले होते. कंपनीने दावा केला होता की या महिलांवर लस टेस्ट करण्यात आलेली नाही. फॅक्टशीटमध्ये सांगण्यात आले आहे, की प्रेग्नंट आणि ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांनी लस घेण्यापूर्वी आपल्या हेल्थकेयर प्रोव्हायडरशी संपर्क साधावा. कोविशिल्ड कुणी घेऊ नये - भारतात दिली जाणारी दुसरी लस म्हणजे कोविशिल्ड. हीचे प्रोडक्शन 'सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया' करत आहे. ही लस ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाने डेव्हलप केली आहे. कोविशिल्डनेही आपल्या फॅक्ट शीटमध्ये, ज्या लोकांना लशीतील कुठल्याही इनग्रेडिएंटमुळे गंभीर अॅलर्जी होण्याची भीती असेल, अशांनी ही लस घेऊ नये, असे म्हटले आहे. कोविशिल्डमध्ये वापरलेले इनग्रेडिएंट एल-हिस्टिडाइन, एल-हिस्टिडाइन हायड्रोक्लोराइड मोनोहायड्रेट, डिसोडियम एडिटेट डायहायड्रेट (EDTA) आणि इंजेक्शनसाठी पाणी आहे. गर्भवती अथवा ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांनीही लस घेण्यासाठी हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचा सल्ला घ्यावा, असेही कोविशिल्डच्या फॅक्टशीटमध्ये सांगण्यात आले आहे. दोन्हीही औषध कंपन्यांच्या फॅक्ट शीटमध्ये सांगण्यात आले आहे, की त्यांनी आपल्या हेल्थकेअर प्रोव्हायडर्सना प्रकृती संबंधीची सर्व माहिती द्यावी. जसे, की आपली मेडिकल कंडीशन, अॅलर्जीची समस्या, ताप, इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड अथवा आपण इतर कुठली लस घेतली असेल, तर या सर्व गोष्टी सविस्तर सांगा. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लशी मुलांना दिल्या जात नाहीत. कारण अद्याप याची टेस्ट करण्यात आलेली नाही. लशींचे साइड इफेक्ट्स - सीरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी आपापल्या लशींच्या साइड इफेक्ट्ससंदर्भात माहिती दिली आहे. यात इंजेक्शन दिल्या जाणाऱ्या जागेवर सूज, वेदना, लाल आणि खाज येणे, अशी लक्षणे आहेत. याशिवाय हात आखडणे, इंजेक्शन दिल्या गेलेल्या हातात कमजोरी, अंग दुखी, डोके दुखी, ताप, बेचैन होणे, थकवा, पुरळ, मळमळ आणि उलटी सारखे काही सर्वसामान्य साइड इफेक्ट्स आहेत. भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये म्हटले होते, की क्लिनिकल ट्रायलमध्ये कोव्हॅक्सीनने चार आठवड्यानंतर देण्यात आलेल्या दुसऱ्या डोसने संक्रमणाविरोधात इम्यूनिटी तयार केली आहे. कोव्हॅक्सीन शरीरात गेल्यानंतर RNA व्हॅक्सीनपेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने संक्रमणाचा सामना करते. सुरुवातीला ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लशीचे अत्यंत गंभीर परिणाम समोर आले होते. यानंतर, कंपनीने दावा केला होता, की कोणत्याही लशीनंतर अशा प्रकारची लक्षणे दिसणे सामान्य गोष्ट आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना तेथे दिल्या जात असलेल्या लशीवर बंदी घालण्यात आली. इग्लंडने म्हटले आहे, की 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना एस्ट्राजेनेकाच्या ऐवजी दुसरी लस घ्यायला हवी. मात्र, भारतात अशा स्वरुपाचे कुठल्याही प्रकारचे निर्देश देण्यात आलेले नाहीत.टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याआरोग्यCorona vaccinecorona virusHealth