Coronavirus: Wearing a filter face mask can be dangerous ?; Health experts warn
Coronavirus: फिल्टर फेस मास्क घालणं धोकादायक ठरु शकतं?; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 03:06 PM2020-07-25T15:06:04+5:302020-07-25T15:09:52+5:30Join usJoin usNext कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आरोग्य तज्ञ सुरुवातीपासूनच मास्क घालण्याचा सल्ला लोकांना देत आहेत. पण ब्रिटीश टेलिव्हिजन प्रजेंटेटर अॅलेक्स बर्सफोर्डने मास्क घालूनही लोकांनी टीका केली. गुरुवारी अॅलेक्सने ट्विटरवर मास्क घातलेला स्वत: चा एक फोटो अपलोड केला, त्यानंतर चाहत्यांनी कमेंट बॉक्समधून त्याची चांगलीच शिकवणी घेतली. चाहत्यांनी या पोस्टला उत्तर म्हणून लिहिले की कोविड -१९ पासून संरक्षणासाठी अॅलेक्स वापरत असलेला फेस मास्क योग्य नाही. गुरुवारी 'गुड मॉर्निंग ब्रिटेन'च्या कार्यक्रमामध्ये अॅलेक्स म्हणाला,' लंडनमध्ये टॅक्सीने प्रवास करताना मी योग्यपणे मास्क घातला होता. तरीही मला फेस मास्क घालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे हे जाणून घ्यायचे आहे. अॅलेक्स म्हणाला, 'फेस मास्क असलेल्या माझ्या फोटोवर काही लोकांनी लिहिले की, मी चुकीच्या प्रकारे फेस मास्क घातला आहे. त्यातील फिल्टरमुळे त्याने असा दावा केला की हे हवेच्या संसर्गापासून बचाव करू शकते परंतु मी श्वास बाहेर सोडल्यास हा मास्क माझ्यापासून लोकांचे रक्षण करणार नाही. इतकं सांगून अॅलेक्सने प्रश्न विचारला की, हे खरचं सत्य आहे का? मला माझ्या चेहऱ्याचा मास्क बदलायला हवा का? या प्रश्नाच्या उत्तरात यूकेच्या आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर सारा जार्विस यांनी अॅलेक्सला सांगितले की, फिल्टर मास्क परिधान करणे धोकादायक ठरू शकते. डॉ. सारा म्हणाल्या, 'फिल्ट मास्कला पीपीई मास्क म्हणतात. फेस मास्क किमान दोन थरांचा असावा. थ्री-लेअर फेस मास्क आपले व्हायरसपासून पूर्णपणे संरक्षण करू शकते. त्याचे पुरावेदेखील आहेत. व्हायरससाठी थ्री-लेयर मास्कच्या आतमध्ये प्रवेश करणे कठीण आहे. या महिन्याच्या सुरूवातीस, 'संसर्गजन्य रोग तज्ञ' डॉ. भरत फणनिया यांनी देखील फिल्टर फेस मास्कबद्दल इशारा दिला होता. तोंडातून 'उच्च वेग हवेचा प्रवाह' येत असेल तर हा मास्क इतरांना संक्रमित करण्याचं काम करू शकते. विशेषतः हा मास्क परिधान करुन सार्वजनिक ठिकाणी जाणे अधिक धोकादायक आहे. मागणी लक्षात घेता, बहुतेक एअर फिल्टर मास्क बाजारात येत आहेत. फिल्टरमधून ताजी हवा आल्यामुळे लोकांना ते खरेदी करायला आवडते. केवळ या मास्कची किंमतच जास्त नाही तर तज्ञांनी याबद्दल धोका देखील व्यक्त केला आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआरोग्यcorona virusHealth