Coronavirus: What are the side effect of 'Hydroxychloroquine' drug Said by Doctor pnm
Coronavirus: धक्कादायक खुलासा; कोरोनाच्या धास्तीने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ औषध घेत असाल तर... By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:53 PM2020-04-08T20:53:58+5:302020-04-08T21:03:46+5:30Join usJoin usNext अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या औषधाची मागणी भारताकडून केली आहे त्याचा दुष्परिणामदेखील आहे. म्हणजेच, त्या औषधाचं सेवन करणं धोकादायक देखील ठरू शकतं. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध कोरोना रूग्णांच्या संसर्गास रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकते, परंतु त्याचे दुष्परिणाम देखील होतात. जर एखाद्या व्यक्तीला आधीच हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असेल तर त्याच्यासाठी हे धोक्याचं आहे. जगातील प्रसिद्ध रुग्णालय मेयो क्लिनिकच्या हृदयरोग तज्ञांनी जगाला याबाबत सतर्क केले आहे. मेयो क्लिनिकचे हृदय रोगतज्ज्ञ डॉ. मेयो अॅकर्मन यांनी म्हटले आहे की सर्व डॉक्टरांना या औषधाच्या दुष्परिणामांची माहिती आहे. हे औषध फक्त सहज खाण्यासारखे नाही. जर कोणी हे खाल्ले तर त्याचे चुकीचे परिणाम त्याला भोगावे लागतील. डॉ. मायकेल अक्रमॅन यांनी एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे अत्यंत धोकादायक दुष्परिणाम आहेत. ज्याला जगातील कोणताही डॉक्टर दुर्लक्ष करू शकत नाही. या औषधाची जाहिरात राजकीयदृष्ट्या केली जात आहे याबद्दल मला आश्चर्य वाटते. परंतु जर डॉक्टरांनी हे औषध आपल्या रूग्णाला दिले तर तो त्याचे सर्व दुष्परिणाम आधीपासूनच सांगून टाकतो. जर ते सांगत नसेल तर चुकीचं आहे असं डॉ. अक्रमॅन म्हणाले. जर औषधाची प्रिस्क्रिप्शन योग्य प्रकारे दिली गेली नाही किंवा जर त्याचा डोस रुग्णाला योग्य प्रमाणात दिला नाही तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. किंवा हृदयाची गंभीर समस्या देखील होऊ शकते. अमेरिकेत या औषधाची जाहिरात का केली जात आहे हे मला माहित नाही असं डॉ मायकेल अक्रमॅन यांनी सांगितले. डॉक्टर पुढे म्हणाले की हे औषध कोरोनाच्या उपचारांसाठी नसून मलेरियासाठी आहे. यातून कोरोना रोखण्याची कोणतीही आशा नाही. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार असं आढळले आहे की हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि एझिथ्रोमाइसिनचे डोस ज्या रुग्णांना दिले त्यातील ११ टक्के रुग्णांना हृदयाचे विकार सुरु झालेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे बरेच दुष्परिणाम आहेत. ते खाल्ल्यानंतर डोकेदुखी, चक्कर येणे, भूक न लागणे, पोटदुखी, उलट्या होणे आणि त्वचेवर पुरळ उठणे असं होऊ शकते. ओव्हरडोजमुळे रुग्ण बेशुद्धही होऊ शकतो जर हे औषध हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीस दिले गेले तर ते त्याच्यासाठी अधिक धोकादायक सिद्ध होऊ शकते. कोरोनासाठी हे औषध वापरणे वैद्यकीय विज्ञानाच्या विरोधात आहे असं डॉ. अक्रमॅन यांनी सांगितले. पहिल्यांदाच मी जगात असं औषध पहात आहे, जे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक औषधाच्या नावाखाली वाढवले जात आहे. हा एक वेडेपणा आहे अशी टीका डॉ. मायकल अक्रमॅन यांनी केली आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus