CoronaVirus : While going to the office keep these 5 things in mind to avoid infection
कोरोना काळातही ऑफिसला जावंच लागत असेल; तर कोरोना संसर्गापासून 'असा' करा बचाव By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 01:39 PM2020-06-30T13:39:05+5:302020-06-30T13:57:44+5:30Join usJoin usNext लॉकडाऊन संपला असला तरी कोरोना व्हायरसची माहामारी मात्र नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख २० हजारांपर्यंत पोहोचली आहे. २ महिन्यांनंतर आता लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये भारतात शिथिलता देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी ऑफिस पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी २० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. संक्रमणापासून वाचण्यासाठी ऑफिस टाईमदरम्यान काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. साफ-सफाई: कोरोनाच्या माहामारीने लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. आधीच्या तुलनेत लोकांमध्ये जास्त प्रमाणात जागरुकता निर्माण झाली आहे. जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर त्याठिकाणी प्रॉपर स्वच्छता , सॅनिटायजेशन आहे की नाही. या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. लिफ्टमध्ये जाऊ नका: कोरोनाकाळात सार्वजनिक सेवांचा वापर करणं टाळा. लिफ्टऐवजी शिड्यांचा वापर करा. जर लिफ्टने हात असाल तर बटन हाताच्या कोपराने प्रेस करा. तसंच हातांना सॅनिटायजर लावा. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. आपल्या जागेवर पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आपली खुर्ची, टेबल, लॅपटॉप, किबोर्ड, फोन किंवा बॅग ठेवण्याची जागा स्वच्छ आहे की नाही ते पाहून घ्या. या वस्तू सॅनिटाईज करून मग कामाला सुरूवात करा. कोणाशीही बोलताना सावधगिरी बाळगा कारण लक्षणं दिसत नसलेले रुग्ण आजूबाजूला असण्याचा धोका असू शकतो. कोणाशीही बोलताना १ मीटरचं अंतर ठेवून बोला. मास्कचा वापर करा. थोड्या थोड्या वेळाने सतत हात धुत राहा. शक्यतो ऑफिसच्या कँटीनमध्ये जाणं टाळा. ऑफिसला जाताना घरून जेवणाचा डबा, पाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जरी कँटीनचे अन्नपदार्थ खात असाल तरी शक्यतो स्वतःच्या डेस्कवरच खा. Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सआरोग्यcorona virusHealth TipsHealth