Covid-19 second wave: हार्ट अॅटॅकमुळे का होतोय कोरोना बाधितांचा मृत्यू? जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 03:13 PM 2021-05-05T15:13:32+5:30 2021-05-05T15:23:27+5:30
ऑक्सफर्ड जर्नलने नुकत्याच कंडक्ट केलेलेल्या एका अभ्यासात समोर आले आहे, की कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या जवळपास 50 टक्के हॉस्पिटलाइज्ड रुग्णांचे रिकव्हरीनंतर महिनाभरात हार्ट डॅमेज झाले आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन आदींचीही कमतरता भासू लागली आहे. कोरोनाचे साइड इफेक्ट्स दीर्घ काळापर्यंत शरीरात राहतात, असेही बोलले जात आहे. यातच आता हार्ट डॅमेजची प्रकरणंही समोर येऊ लागली आहेत. (CoronaVirus Why Corona positive patients dying from heart attack know symptoms and treatment)
ऑक्सफर्ड जर्नलने नुकत्याच कंडक्ट केलेलेल्या एका अभ्यासात समोर आले आहे, की कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या जवळपास 50 टक्के हॉस्पिटलाइज्ड रुग्णांचे रिकव्हरीनंतर महिनाभरात हार्ट डॅमेज झाले आहे. यामुळे रिकव्हरीनंतरही रुग्णाचा हार्ट रेट चेक करणे आवश्यक झाले आहे. याकडे दूर्लक्ष केल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
तज्ज्ञांच्यामते कोरोना इंफेक्शन शरीरात इंफ्लॅमेशन निर्माण करते. यामुळे हृदयाचे स्नायू कमजोर पडतात. यामुळे हृदयाच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि ब्लड क्लॉटिंगची समस्या निर्माण होऊ लागते.
दुसरे म्हणजे, व्हायरस थेट आपल्या रिसेप्टर सेल्सवर हल्ला करू शकतो. याला ACE2 रिसेप्टर्स म्हणूनही ओळखले जाते. तो मायोकार्डियम टिशूत जाऊनही नुकसान पोहोचवू शकतो. मायोकार्डायटिस सारखी समस्या, जी हार्ट मसलचे इन्फ्लेमेशन आहे. वेळ असताच याकडे लक्ष दिले गेले नही, तर एका वेळेनंतर हार्ट फेल्यूअरही होऊ शकते. यामुळे, आधीच हृदय रोगाचा सामना करत असलेल्या रुग्णांची समस्या वाढू शकते.
हार्ट फेल केव्हा होते - जेव्हा हृदयाचे स्नायू आवश्यक असलेल्या प्रमाणात, रक्त पम्प करू शकत नाहीत, तेव्हा हार्ट फेल होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत अरुंद रक्तवाहिन्या आणि हाय ब्लड प्रेशर हृदयाला पुरेशा पंपिंगसाठी कमकुवत बनवतात. ही एक क्रॉनिक समस्या आहे. यावर वेळेत उपचार झाले नाही, तर स्थिती बिघडू शकते. योग्य उपचार आणि थेरपी मानसाचे वय वाढवू शकतात.
तज्ज्ञ लोक सल्ला देतात, की ज्या लोकांना कोरोनानंतर छातीत दुखण्याची तक्रार आहे अथवा संक्रमणाच्या आधीपासूनच ज्यांना साधारण हार्ट डिसीज होता, त्यांनी याचे इमेजिंग नक्की करायला हवे. यामुळे व्हायरसने हृदयाच्या स्नायूंना कीतपत हाणी पोहोचवली आहे. यासंदर्भात आपल्याला माहिती मिळेल. सामान्य लक्षणे असलेल्या लोकांनीही हे केल्यास फायदा होऊ शकतो.
व्हायरल आजारानंतर अनेक रुग्णांना क्रॉनिक हार्ट मसल वीकनेस, कार्डिएक एनलार्जमेन्ट आणि लो हार्ट इजेक्शन फ्रॅक्शनची तक्रार असते. यालाच डायलेटेड कार्डियोमायोपॅथीही म्हटले जाते. कोविड इंफेक्शननंतर कार्डियोमायोपॅथी अधिक घातक ठरू शकते आणि यामुळे हार्ट फेल्यूरदेखील होऊ शकते.
उपचार काय - सुरुवातीच्या स्थरावरच उपचार मिळाल्यास हे कंट्रोल केले जाऊ शकते. हार्ट फेल्यूअरच्या अॅडव्हॉन्स प्रकरणांत आवश्यकता भासल्यास लेफ्ट व्हेंट्रीक्यूलर असिस्ट डिव्हाइस (LVAD) प्रोसिजर अथवा थेरपीसह एक हार्ट ट्रांसप्लांट केले जाऊ शकते. LVAD लेफ्ट व्हेंट्रिक्यूलरला मदत करते. जे हार्टचे सर्वात महत्वाचे पम्पिंग चेम्बर आहे. अशा स्थितीत एक अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो.
हार्ट फेल्यूअरचे लक्षण- हार्ट फेल होण्यापूर्वी रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय अशक्तपणा अथवा थकवा वाढू शकतो. पंजा, टाच अथवा पायात सूज येऊ लागते. हार्ट बीट वाढू शकतात. आपली एक्सरसाइज करण्याची क्षमताही कमी होऊ शकते. सातत्याने खोकला आणि फ्लूड रिटेंशनमुळे वजन वाढू शकते. भूख लागत नाही आणि नेहमी नेहमी लघवीसाठी जावे लागते.
लक्षणे दिसल्यानंतर काय कराल - जर एखाद्या व्यक्तीला ही सर्व लक्षणे जाणवत असतील, तर त्याने तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. यावर स्वतःच उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. कारण डॉक्टरच यामागील नेमके कारण सांगू शकतात.