CoronaVirus :You get positive after you recover from coronavirus risk is not there myb
Coronavirus: घाबरु नका! कोरोनातून बरे झाल्यानंतर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला तरी... By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 09:47 AM2020-05-20T09:47:22+5:302020-05-20T10:07:19+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर आत्तापर्यंत कोणतीही लस किंवा औषध शोधण्यात आलेले नाही, त्यामुळे लोकांमध्ये या जीवघेण्या आजाराबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे अनेकांचा मृत्यू झाला असला तरी कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांची संख्या सुद्धा मोठी आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण तपासणीदरम्यान जर पुन्हा पॉजिटिव्ह आले तर त्यांच्यात संक्रमण पसरण्याचा धोका खूप कमी असतो. असा दावा साऊथ कोरियातील शास्त्रज्ञांनी केला आहे. तसंच लोकांना आपल्या कामाला सुरूवात केल्यास परत टेस्ट करण्याची गरज भासणार नाही. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोरियन सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल ऐंड प्रिवेंशनच्या संशोधकांनी कोरोना व्हायरसमधून बाहेर आलेल्या २८५ रुग्णांवर केलेल्या रिसर्चमधून असा अंदाज वर्तवला आहे. या शोधाला कोरोनाच्या लढाईत सकारात्मक मानलं जात आहे. दक्षिण कोरियातून मिळालेल्या पुराव्यानुसार आता असं म्हणता येईल की, जे लोक कोरोना व्हायरसपासून बरे झाले आहेत. त्यांच्यावर घालण्यात आलेल्या प्रतिबंधामध्ये शिथिलता आणल्यास कोरोना पसरण्याचा धोका नसेल. दरम्यान सध्या चीनच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी औषध तयार केल्याचा दावा केला आहे. ज्याद्वारे कोरोना व्हायरसला संपवता येऊ शकतं. रिपोर्टनुसार पीकिंग विद्यापीठातील संशोधक या औषधांवर काम करत आहेत. याद्वारे टेस्टिंग सुरू आहे. चीनच्या पीकिंग युनिव्हरसिटीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या औषधांवर परिक्षण सुरू आहे. युनिव्हरसिटीचे बीजिंग एडवांस्ड इनोवेशन सेंटर फॉर जीनोमिक्सचे डॉयरेक्टर सनी यांनी सांगितले की, हे औषध एनिमल टेस्टिंग दरम्यान सफल ठरलं आहे. सगळ्यात आधी उंदरांवर करण्यात आलेले परिक्षणातून चांगले रिजल्ट समोर आले आहेत. जेव्हा उंदरांमध्ये न्यूट्रलाइजिंग एंटीबॉडीज टाकण्यात आले. तेव्हा पाच दिवसात त्याच्यातील व्हायरल इन्फेक्शन कमी झालं होतं. म्हणजेचं हे औषध परिणाम कारक ठरत असल्याचे तज्ञांनी सांगितले. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याहेल्थ टिप्सcorona virusCoronaVirus Positive NewsHealth Tips