कोरोनातून बरं झाल्यानंतर २ ते ३ महिन्यांपर्यंत दिसू शकतात 'ही' गंभीर लक्षणं; तज्ज्ञांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 06:49 PM 2020-10-20T18:49:06+5:30 2020-10-20T19:09:53+5:30
CoronaVirus News & Latest Upadtes : व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर दोन किंवा तीन महिन्यानंतर ६४ टक्के रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होण्याची समस्या उद्भवली होती, तर ५५ टक्के रुग्णांना थकवा जाणवला होता. कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर पूर्णपणे बरं झाल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर दोन ते तीन महिन्यांपर्यंत रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा, एन्जायटी, डिप्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांना रुग्णालयात भरती असलेल्या ५८ कोरोनाच्या रुग्णांमध्ये दीर्घकाळपर्यंत आजाराची लक्षणं आढळली आहेत. कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर काही रुग्ण हे मल्टीपल ऑर्गेन्स डिसीज या स्थितीत असल्यामुळे सुज येण्याची समस्या उद्भवते. इतर वैज्ञानिकांनी आतापर्यंत याबाबत आपलं मत व्यक्त केलेलं नाही. MedRxiv मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.
ऑक्सफोर्डच्या रेडक्लिफ डिपार्टमेंट ऑफ मेडिसनमधील डॉक्टर बॅटी रमन यांनी सांगितले की, कोरोनाशी निगडीत असलेल्या शारीरिक समस्यांवर अधिक संशोधन व्हायरल हवं. याशिवाय क्लिनिकल केअरसाठी एक मॉडेल विकसित करण्यात येत आहे. ज्याद्वारे डिस्चार्ज केलेल्या रुग्णांवर लक्ष देता येऊ शकते.
ब्रिटनच्या नॅशलन इंस्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणानंतर उद्भवत असलेल्या समस्यांना लॉन्ग कोविड असंही म्हटलं जातं. त्यात शरीर आणि मेंदूवर परिणाम करत असलेल्या लक्षणांचा समावेश आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनात दिसून आले की, व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर दोन किंवा तीन महिन्यानंतर ६४ टक्के रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होण्याची समस्या उद्भवली होती, तर ५५ टक्के रुग्णांना थकवा जाणवला होता.
एमआरआय स्कॅनिंगमध्ये ६० टक्के कोरोना रुग्ण हे असामान्य स्थितीत आढळून आले. किडनी मध्ये २९ टक्के , हृदयात २६ टक्के आणि लिव्हरमध्ये १० टक्के बदल झालेला दिसून आला. डॉ. रमन यांनी सांगितले की, शरीरात झालेल्या बदलातून क्रॉनिक इन्फ्लेमेशनची लक्षणं दिसून आली.
आतापर्यंत जगभरात ४ कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. या जीवघेण्या व्हायरसने ११ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आयर्लंडने आता सहा आठवड्यांसाठी राष्ट्रीय लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आज मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इस्राइलने लॉकडाऊनची घोषणा केली होती.
डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार आयर्लंडमध्ये पुढच्या सहा आठवड्यापर्यंत युरोपमधील सर्वात कठोर लॉकडाऊन लागू राहणार आहे. मात्र देशात गेल्या २४ तासांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. सरकारने सांगितले की, येणाऱ्या आठवड्यातील संभाव्य धोका विचारात घेऊन लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे.