चिंता वाढली! सर्दी, ताप नाही तर कोरोनाचं 'हे' लक्षण ठरतंय त्रासदायक; वेळीच व्हा सावध अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 05:28 PM2022-10-10T17:28:09+5:302022-10-10T17:34:41+5:30

कोरोनाचे एक सामान्य लक्षण समोर आले आहे, जे बहुतेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे.

कोरोनाने देशातच नव्हे तर जगभरात हाहाकार माजवला आहे. भारत, अमेरिका, रशियासह सर्व देशांमध्ये कोरोनाचे लाखो रुग्ण आढळले. डेल्टा प्रकाराने भारतात हजारो लोकांचा बळी घेतला. कोरोनासोबत खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे दिसून आली. केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेनंतर लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत झाली आहे.

कोरोनाचा वेग आता ओसरला आहे पण तरी देखील मोठ्या संख्येने लोक या व्हायरसच्या विळख्यात आहेत. कोरोनाचे एक सामान्य लक्षण समोर आले आहे, जे बहुतेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे. ताप, डोकेदुखी आणि सर्दी या लक्षणांव्यतिरिक्त, सर्वात सामान्य लक्षण म्हणजे घसा खवखवणे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, घसा खवखवणे हे कोरोनाग्रस्त दोन तृतीयांश लोकांमध्ये एक लक्षण म्हणून पाहिले जाते. एका रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, ताप आणि वास न येणे आणि चव न कळणं हे कमी लोकांमध्ये दिसून येत आहे. भूक न लागणे हे अजूनही कोविडच्या विशिष्ट लक्षणांपैकी एक आहे.

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दहापैकी तीन प्रौढांनी साथीच्या रोगाच्या सुरुवातीस भूक न लागणे नोंदवले. जे आता 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दहापैकी चार लोकांमध्ये दिसून येत आहे. कोरोना लसीच्या तीन डोसनंतर एक चतुर्थांश लोक (25-27%) भूक लागत नसल्याचं म्हणतात.

इतर लक्षणे जी सामान्यतः लोकांमध्ये दिसतात. ती म्हणजे डोकेदुखी, शिंका येणे, सतत खोकला, धाप लागणे आणि कधीकधी ताप. COVID दरम्यान आणि नंतर लोकांमध्ये थकवा अधिक दिसून आला. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. छातीत दुखणे, झोपेचा त्रास, स्मरणशक्ती कमी होणे अशी लक्षणेही दिसू लागली आहेत.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की लोकांना कोविडच्या नवीन लक्षणांबद्दल माहिती नाही. साथीच्या आजारापासून ताप हे कोरोनाचे प्राथमिक लक्षण म्हणून पाहिले जात आहे. तथापि, आजकाल ताप येत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोरोना नाही. घसा खवखवणे आणि हलकी डोकेदुखी असल्यास देखील संसर्ग असण्याची शक्यता आहे.

ताप आणि वास न येणे फार क्वचितच दिसून येईल. म्हणूनच लोकांना असे वाटते की जेव्हा त्यांना ताप आणि इतर लक्षणे दिसतात तेव्हा त्यांना कोविड नाही, परंतु प्रत्यक्षात ते कोरोनाच्या जाळ्यात अडकलेले असतात. त्यामुळे सतर्क राहणं, काळजी घेणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.