covid vaccination in india health min says registering with cowin is mandatory
Co-WIN अॅपवर रजिस्टर केल्यानंतरच दिली जाणार कोरोनावरील लस, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 04:12 PM2021-01-15T16:12:38+5:302021-01-15T16:30:39+5:30Join usJoin usNext भारतात उद्यापासून म्हणजेच 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविन अॅप (Covid Vaccine Intelligence Work) सुद्धा लाँच करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या अॅपशी संबंधित माहिती दिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोविन अॅपचे सेल्फ-रजिस्ट्रेशन मॉड्यूल लवकरच जारी केले जाईल. तसेच, लसीकरण प्रक्रियेसाठी अॅपवर नोंदणी करणे देखील अनिवार्य असेल. कोरोना लस घेण्यासाठी कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोविन अॅपवर नोंदणी केलेल्यांनाच क्यूआर कोड आधारित लसीकरण प्रमाणपत्र दिले जाईल, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरवरून दिली आहे. कोविन अॅप अद्याप कार्यरत नाही. जर Google अॅपमधून यासारखे एखादे अॅप डाउनलोड केले असेल तर ते चालणार नाही. याबाबत आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही इशारा दिला आहे. सेल्फ रजिस्ट्रेशन प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, त्यामुळे लोकांनी फसव्या अॅप्सपासून सावध राहिले पाहिजे, असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी भीती व्यक्त केली आहे की, कोविन या नावानेही अनेक बनावट अॅप्स येऊ शकतात, त्यामुळे लोकांनी या बाबतीत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. सध्या कोविन अॅप बॅक एंड सॉफ्टवेयर म्हणून काम करत आहे. ज्यामुळे हेल्थवर्कर्सच्या पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी वापरले जाऊ शकेल. रिपोर्ट्सनुसार, मार्च महिन्यापासून सामान्य लोकांना अॅपवर नोंदणीची सुविधा मिळेल. कोविन अॅप एक ई-व्हीआयएन (e-VIN) प्लॅटफॉर्मचा एक प्रकार आहे, ज्याद्वारे लसींचा साठा, तापमान आणि कोरोनाची लस घेणाऱ्यांना ट्रॅकिंग केले जाऊ शकेल. या अॅपअंतर्गत 80 लाख लाभार्थ्यांची यापूर्वीच नोंदणी झाली असल्याची माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. सध्या या अॅपद्वारे कोणीही नोंदणी करू शकत नाही, फक्त या अधिकाऱ्यांनाच या अॅपचा अॅक्सेस देण्यात आला आहे. याअंतर्गत नोंदणी करण्यासाठी सामान्य लोकांसाठी चार मॉड्यूल तयार केले गेले आहेत. पहिले बॅक एंड मॉड्यूल आहे, त्यावर आधारित अॅप सध्या कार्यरत आहे. दुसरे अॅडमिनिस्ट्रेटर मॉड्यूल आहे, ज्या अंतर्गत एकावेळी किती लोकांना लस दिली जाऊ शकते हे सांगितले जाईल. यामध्ये, अॅडमिन देखील लसचे सत्र निश्चित करू शकते. रजिस्ट्रेशन मॉड्यूल अंतर्गत, कोणीही स्वत:च्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. हे मॉड्यूल लसींचे डेटा रेकॉर्ड ठेवण्यासाठी आहे. येथे लसीकरणाचा डेटा पडताळला जाईल आणि पुढील डोस कधी देण्यात येईल, हे देखील सांगितले जाईल. तसेच, ब्लॉक स्तरावर अशा मॉड्यूल अंतर्गत नोंदणी देखील केली जाऊ शकते. कोरोना लस मिळविण्यासाठी तुम्हाला फोटो आयडी पुराव्यासह ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. सरकार लसींची उपलब्धता आणि प्रॉयरिटी लिस्टमध्ये तुमच्या पोझिशनच्या आधारावर लसीकरणाचे शेड्युल तयार केले जाईल. यानंतर तुम्हाला एक एसएमएस पाठविला जाईल, यामध्ये लस केव्हा आणि कोठे दिली जाणार आहे. त्यानंतर ठरलेल्या वेळेस तुम्हाला लसीकरण केंद्रावर जावे लागेल. लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशनवेळी दिलेला फोटो आयडीदेखील आपल्याबरोबर घ्यावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम सुरू करणार आहेत. या लाँचिंगदरम्यान देशभरातील 3000 सेशन साइट व्हर्च्युअल पद्धतीने कनेक्ट केल्या जातील. लाँचिंगवेळी प्रत्येक सत्रात सुमारे 100 लोकांना लस दिली जाईल. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 3 कोटी हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सला लस दिली जाणार आहे.टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यातंत्रज्ञानमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccinecorona virustechnologyCoronavirus in Maharashtra