Detox Diet : lifestyle tips for food digestion after diwali over eating
Detox Diet : दिवाळीनंतर हे डी-टॉक्स पदार्थ आहेत आवश्यक By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:09 PM2018-11-15T15:09:27+5:302018-11-15T15:18:56+5:30Join usJoin usNext लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. लिंबूच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. लिंबूच्या सालीमध्ये अँटी ऑक्सिडेन्ट्सदेखील असते, यामुळे डी-टॉक्सिफिकेशन होण्यास सुरुवात होते. आहारात कोथिंबिरीचा समावेश केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोथिंबिरीमुळे शरीरातील दुषित आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. सॅलेड, दाळींमध्ये कोथिंबिरीचा समावेश तुम्ही करू शकता. शिवाय, याची चटणीदेखील स्वादिष्ट लागते. टोमॅटोमुळे शरीर योग्य पद्धतीनं डीटॉक्स होण्यास मदत होते. सणांच्या वेळेस पचण्यास जड जेवण मोठ्या प्रमाणात जेवले होत आहे, असे वाटल्यास टोमॅटोचे सूप किंला सॅलेडमध्ये टोमॅटोचा समावेश करावा. एक वाटी दही शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असते. दहीमध्ये प्रोबायॉटिक्स असते, यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. डी-टॉक्सिफिकेशनसाठी ग्रीन टी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीरातील हानिकारक तत्त्वं बाहेर फेकली जातात. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सब्यूटी टिप्सHealthHealth TipsBeauty Tips