Coronavirus : कोविडमुळे 'या' गंभीर आजाराचा वाढतोय धोका, लहान मुलेही होताहेत त्याचे शिकार.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:37 AM 2021-06-02T11:37:58+5:30 2021-06-02T11:52:33+5:30
Coronavirus : वेश्विक स्तरावर डायबिटीस लोकांसाठी घातक ठरत आहे. असे सांगितले जात आहे की, डायबिटीसला वाढण्यासाठी प्रोत्साहन देणारे फॅक्टर्स अजून पूर्णपणे स्पष्ट नाहीत. कोरोना व्हायरस हा केवळ डायबिटीसने ग्रस्त लोकांसाठी घातक नाही तर अनेकांना तो डायबिटीससारखा आजार देऊन देत आहे. अमेरिकेतील वेटरन्स अफेअर्स सेंट लुइस हेल्थ केअर सिस्टीममध्ये क्लिनिकल एपिडोमोलॉजी सेंटरचे निर्देशक जियाद अल-एली यांनी सांगितले की, सुरूवातीला यावर विश्वास ठेवण कठीण होतं की, कोविडमुळे असं होत आहे.
वेश्विक स्तरावर डायबिटीस लोकांसाठी घातक ठरत आहे. असे सांगितले जात आहे की, डायबिटीसला वाढण्यासाठी प्रोत्साहन देणारे फॅक्टर्स अजून पूर्णपणे स्पष्ट नाहीत. पण काही ड़ॉक्टरांना शंका आहे की, SARs-CoV-2 व्हायरस पॅंक्रियाजसोबतच इन्सुलिन तयार करणाऱ्या ग्रंथीचंही नुकसान करत आहे.
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे लोकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. जसे की डॉक्टरांशी वेळेवर संपर्क न केल्याने आजाराबाबत उशीरा माहिती मिळणे. अशात आजाराचा धोका अधिक वाढतो. वैज्ञानिकांनुसार, काही मुलांमध्ये कोरोना व्हायरसची हलकी लक्षणे आढळल्यावरही त्यांच्यात डायबिटीसची सुरूवात वेगाने होत आहे.
महामारीच्या सुरूवातीच्या दिवसात कोरोना व्हायरसला मुख्यत्वे फुप्फुसाचा आजार मानलं जात होतं. कोरोना व्हायरस शरीरात अनेक अवयव आणि शरीरातील क्रियांना बेकार करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. अशात पूर्णपणे बरे झाल्यावरही १० पैकी एका रूग्णात याची लक्षणे सतत दिसत राहतात. मेटाबॉलिक संबंधी समस्यांमध्ये कधी-कधी इन्सुलिनच्या जास्त खुराकीची गरज असते. याने व्यक्तीमध्ये डायबिटीसचा धोका विकसीत होतो. रिसर्चनुसार, जे लोक आधीच डायबिटीससोबत लढत आहेत, त्यातील अनेक लोकांमध्ये सूज आढळून आली.
डायबिटीस एक असा आजार आहे ज्यात शरीर पुऱेशा प्रमाणात इन्सुलिनचं निर्माण करणं किंवा त्यांचा ठीकपणे वापर करणं यात अपयशी ठरतं. हे इन्सुलिन हार्ट स्ट्रोक आणि लिव्हर फेलपासून ते अल्सर आणि अंधपणा यांचाही धोका निर्माण करू शकतं. अल एली आणि टीमला अमेरिकेत वेटरन्स अफेअर्स विभागाच्या डेटाबेसच्या आधारावर पहिल्यांदा हा प्रभाव जाणवला. त्यांना आढळून आलं की, कोविड संक्रमणातून वाचलेल्या लोकांच्या तुलनेत कोविडमधून ठीक झालेल्या लोकांमध्ये सहा महिन्यांच्या आत डायबिटीस होण्याची शक्यता जवळपास ३९ टक्के अधिक होती. प्रत्येक १ हजार रूग्णांपैकी ६ लोकांना डायबिटीस होण्याचा धोका आहे.
अल-एली यांच्यानुसार, अमेरिकेत हिवाळ्यात १३०,००० पेक्षा जास्त कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जगभरात १५.३ कोटींपेक्षा जास्त लोकांना संक्रमण झालं होतं. यात भारतातील २ कोटी लोकांचाही समावेश आहे. चीननंतर भारत एक असा देश आहे जिथे सर्वात जास्त लोक डायबिटीसने पीडित आहेत. अल-एली यांचा डेटा गेल्या महिन्यात नेचर मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये ५० हजार रूग्णांवर तीन आठवडे रिसर्च केला. यातील डिस्चार्जनंतर जवळपास २० आठवड्यांनंतर रूग्णांमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता ५० टक्के आढळून आली.
किंग्स कॉलेज लंडनमध्ये मेटाबॉलिक आणि बेरिएट्रीक सर्जरीचे प्रमुख फ्रांसेस्को रूबिनो म्हणाले की आम्हाला दोन महामारींची टक्कर होण्याचा धोका दिसतो आहे. वैज्ञानिकांनी असे फॅक्टर्स शोधले आहेत ज्याने कोविड डायबिटीसचा धोका वाढवू शकतो. यात अशीही शक्यता आहे की, पॅंक्रियाजच्या इन्सुलिन बीटा सेल्स एकतर व्हायरस द्वारे किंवा संक्रमण झाल्यावर शरीराच्या प्रतिक्रियेमुळे नष्ट होतात. हॉंगकॉंग विश्वविद्यालयामध्ये पॅथॉलॉजीचे क्लिनिकल प्रोफेसर जॉन निलोक्स यांच्यानुसार, कोविड रूग्णांना डायबिटीस होण्याची अनेक कारणे आहेत. संक्रमणाप्रति एक्यूट स्ट्रेस रिस्पॉन्स, स्टेरॉइडचा अधिक वापर ज्याने ब्लडमधील शुगरचं प्रमाण वाढतं.
जगभरातील ५०० डॉक्टर रूबिनो यांच्या डायबिटीस रजिस्ट्रीच्या माध्यमातून डेटा शेअर करण्यासाठी तयार झाले आहेत. आतापर्यंत रजिस्ट्रीच्या माध्यमातून जवळपास ३५० केसेस दाखल होत्या. त्यासोबतच यासंबंधी रूग्णांकडून, त्यांच्या आई-वडिलांकडून ई-मेल द्वारे माहिती मिळत आहे. या माहितीनुसार, जवळपास ८ वर्षाच्या मुलामध्ये ज्याला २ महिन्यांपूर्वी कोविड झाला होता, त्याच्यातही डायबिटीस आढळला आहे.
हे म्हणणं अवघड आहे की, कोविडमुळे डायबिटीस होतो. अशात लॉस एंजलिसच्या डॉक्टरच्या रिपोर्टनुसार, लहान मुलांमध्ये टाइप २ डायबिटीसच्या केसेस आढळल्या आहेत.. डायबिटीसचा धोका वजन वाढणाऱ्या मुलांमध्ये किंवा कमी फिजिकल अॅक्टिविटी करणाऱ्या मुलांमध्ये जास्त आढळून आला आहे.
त्यांना आढळलं की, गेल्यावर्षी टाइप २ डायबिटीसच्या पाच केसेसपैकी एकाला डायबिटीक केटोएसिडोसिससाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज होती. केटोएसिडोसिसमध्ये इन्सुलिनमुळे ब्लडमध्ये अॅसिडचं निर्माण होतं. याउलट २०१९ मध्ये केवळ ३ टक्के रूग्णांनाच या जीवघेण्या समस्येचा सामना करावा लागला होता. तर २०२० मध्ये लहान मुलांमध्ये कोविड सक्रिय नव्हता.
टाइप १ डायबिटीस ऑटोइम्यून प्रतिक्रियेमुळे होता जो पॅंक्रियाजमध्ये इन्सुलिन बनवणाऱ्या कोशिकांना नष्ट करतो. कॅनडातील डॉक्टरांनी सांगितलं की, महामारीमुळे टाइप १ डायबिटीस असलेल्या मुलांच्या उपचारात उशीर होऊ शकतो.