diabetes diet foods control sugar level body
डायबिटीज नियंत्रणात आणायचाय?, मग हे नक्की वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 01:47 PM2018-02-02T13:47:08+5:302018-02-02T13:54:17+5:30Join usJoin usNext कारले : कारल्यातील कॅरेटिन नावाच्या रसायनामुळे डायबिटीज नियंत्रित करता येतो. याशिवाय, यामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले स्टिरॉइड्स आपल्या शरीरातील साखरेचा स्तर नियंत्रित करतात. डायबिटीज असणा-यांना नेहमी कारल्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारल्याच्या सेवनामुळे तुमच्या शरीराला अत्यंत फायदा होता. नियमित 100 मिलीलीटर कारल्याचा रस तीन वेळा पाण्यातून प्यायल्यास डायबिटीजच्या रुग्णांना यांचा चांगला फायदा होता. मेथीचे दाणे : मेथीचे दाणे पदार्थांची चव वाढतात, सोबतच शरीराचं आरोग्यही चांगलं ठेवण्यास मदत करतात. मेथीच्या दाण्यांची पेस्ट करुन जेवणापूर्वी 15 मिनिटांपूर्वी खावी. दूध : दूध हे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे परिपूर्ण असं मिश्रण आहे. हे साखरेच्या स्तराला नियंत्रित करण्याची मदत करते. नियमित आहारात एक ग्लास दूधाचे सेवन करावे. मध : कार्बोहायड्रेट्स, कॅलरी आणि अनेक प्रकारचे सूक्ष्म पोषक तत्त्व मधामध्ये आहेत. मध डायबिटीज कमी करण्यास मदत करतं. यामुळेच डायबिटीज रुग्णांना साखरऐवजी मधाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. प्रथिने : डायबिटीजच्या रुग्णांनी योग्य प्रमाणात प्रथिनांचं सेवन कराव. दूध, दही, ताक, पनीर, अंडी, मासे, सोयाबीन इत्यादींचं सेवन करावं. इन्सुलिन किंवा औषधांचं सेवन करणा-या डायबिटीज रुग्णांनी योग्य वेळी जेवण करावं. आहारात कोशिंबिरीचंही सेवन करावेटॅग्स :आरोग्यमधुमेहHealthdiabetes