Diabetes Reasons : डायबिटीस होण्याची ४ मुख्य कारणं, या सवयी आजच सोडा नाही तर होईल पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:41 PM2022-02-18T12:41:46+5:302022-02-18T12:53:42+5:30

Diabetes Reasons : इन्सुलिनच्या कमतरतेमुळे अनेक कोशिका आणि अवयवांवर वाईट प्रभाव पडतो. डायबिटीसमुळे हार्ट अटॅक, डोळे कमजोर होणे आणि किडनीशी संबंधित समस्या होण्याचा धोका असतो.

डायबिटीस (Diabetes) एक असा गंभीर आजार आहे जो एकदा का कुणाला झाला तर आयुष्यभर पाठ सोडत नाही. डायबिटीसच्या स्थितीत शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा शरीर त्याचा तितका वापर करू शकत नाही त्यामुळे अनेक समस्या होतात.

इन्सुलिनच्या कमतरतेमुळे अनेक कोशिका आणि अवयवांवर वाईट प्रभाव पडतो. डायबिटीसमुळे हार्ट अटॅक, डोळे कमजोर होणे आणि किडनीशी संबंधित समस्या होण्याचा धोका असतो. तुम्हाला डायबिटीस होण्याची कारणं माहीत आहेत का? नसेल माहीत तर ते माहीत असयला हवे. जेणेकरून तुम्ही यापासून बचाव करू शकाल.

१) जेनेटिक कारण - जगभरात करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, जर तुमच्या परिवारात कुणाला डायबिटीसची समस्या असेल तर तुम्हालाही डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. हा आजार जीन्समधून तुमच्यात येतो.

२) अनहेल्दी लाइफस्टाईल - तुमचं शरीर नेहमीच अॅक्टिव राहणं गरजेचं असतं. जे लोक वर्कआउट करत नाहीत किंवा जागचे हलत नाहीत त्यांना क्रॉनिक डिजीज होण्याचा धोका वाढतो. हा धोका टाळायचा असेल तर दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी एक्सरसाइज केली पाहिजे.

३) प्रमाणापेक्षा जास्त गोड खाणे - काही लोकांना जास्त गोड खाण्याची सवय असते. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, याने डायबिटीसचा धोका अधिक पटीने वाढतो. कारण कॅलरी वाढणं हे डायबिटीसचं एक मोठं कारण आहे. त्यामुळे गोड पदार्थ प्रमाणात खावीत.

४) लठ्ठपणा - जर तुमचं वजन सतत वाढत असेल तर लगेच एक्सरसाइज करणं सुरू करा. कारण लठ्ठपणा वाढल्याने शरीरात ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यात अडचण निर्माण होते. आणि हळूहळू डायबिटीसचा धोका अधिक वाढत जातो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी एक्सरसाइज करा. एका जागी बसून राहू नका. तसेच योग्य आहार घ्या.

वेळीच व्हा सावध - जर तुम्हाला वाटतं की, तुम्हाला डायबिटीस होऊ नये तर आजपासूनच आरोग्याची काळजी घेणं सुरू करा. अनहेल्दी लाइफस्टाईल सोडा आणि हेल्दी पदार्थ खाणं सुरू करा. डायबिटीसपासून वाचण्यासाठी बॉडी अॅक्टिविटीज गरजेच्या आहेत. ज्याने कॅलरी जास्तीत जास्त बर्न होतील.