Do not share headphones and cosmetics with your friend
चुकूनही बेस्ट फ्रेंन्डसोबत शेअर करू नका 'या' गोष्टी; नाहीतर...! By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 02:39 PM2019-05-30T14:39:14+5:302019-05-30T14:47:29+5:30Join usJoin usNext लहानपणी अनेकदा आपण थोरामोठ्यांकडून ऐकतो की, गोष्टी एकमेकांशी शेअर कराव्यात. मग ती कोणतीही गोष्ट असो. एवढचं नाही तर आपल्याला उदाहरण म्हणून काही म्हणीसुद्धा ऐकवल्या जातात. आपणही ते ऐकतो आणि सर्वांशी मिळूनमिसळून वागतो. सर्वांसोबत गोष्टी, आपल्या वस्तू शेअर करतो. शाळेतल्या मधल्या सुट्टीत डबा शेअर करतो. भावडांसोबत कपडे, खेळणी शेअर करतो. पण आपली हिच सवय आपल्यासाठी समस्या ठरू शकते. त्यामुळे तुमचं मन कितीही मोठं असंल आणि समोरची व्यक्ती तुमची कितीही जवळची असली तरिही काही वस्तू किंवा गोष्टी त्यांच्यापासून शेअर करणं टाळलं पाहिजे. जाणून घेऊया कोणत्या वस्तू एकमेकांशी शेअर करणं टाळल्या पाहिजे त्याबाबत... (Image Credit : Tor Teen Blog)ईयरफोन्स ईयरफोन्स शेअर करणं अत्यंत कॉमन गोष्ट आहे. अनेकदा बेस्ट फ्रेन्डस एका-एका कानामध्ये ईयरफोन्स लावून गाणी ऐकण्यास किंवा व्हिडीओ पाहण्यास सुरुवात करतात. जर तुम्हीही असं करत असाल तर, आता असं करणं टाळा. कारण ईयर वॅक्समध्ये अनेक प्रकारचे जर्म्स आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तींसोबत शेअर करतो. त्यावेळी कानामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. हेअरब्रश किंवा कंगवा अनेकदा तुम्ही आणि तुमचे फ्रेंड्स बाहेर आउटिंगसाठी जाता किंवा बाहेर फिरण्यासाठी गेल्यानंतर केस ठिक करण्यासाठी तुम्ही एकमेकांचे हेअरब्रश शेअर करता. यामुळे केसांच्या समस्या उद्भवतात. एवढचं नाही तर त्वचेच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. (Image Credit : Women Fitness)लिपस्टिक आणि लिपबाम फ्रेंड्समधील आणखी एक कॉमन गोष्ट म्हणजे, एकमेकांची लिपस्टिक किंवा लिपबाम वापरणं. अनेकदा मैत्रिणीने लावलेला शेड तुम्हाला आवडतो आणि तुम्ही तिच्याकडून ट्राय करण्यासाठी तो शेड घेऊन स्वतःच्या ओठांवर लावता. पण तुम्हला माहीत आहे का? लिपस्टिक शेअर केल्यामुळे हरपीज सारख्या आजारांचा सामना करावा लागतो. तुम्ही जरी तुमची लिपस्टिक कोणासोबत शेअर करत नसाल तरिही वेळोवेळी याची टॉप लेअर स्वच्छ करा. (Image Credit : Moda Cosmetics)लोफह आंघोळीसाठी तुम्ही लोफह वापरत असाल तर तो कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका. यामुळे रॅशेज, स्किन अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही वापरत असलेला लोफह कोणासोबतही शेअर करू नका. काजळ आणि कॉस्मेटिक्स मस्करा, काजळ आणि फेस पावडर यांसारखे कॉस्मेटिक प्रोडक्ट्सही शेअर करण्यापासून दूर राहा. पार्लरमध्येही तयार होण्यासाठी जाणार असाल तर हायजिन मेन्टेन करा. साबण साबणामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात असा अनेक लोकांचा समज असतो. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की, साबण एकमेकांसोबत शेअर करणं ठिक असेल तर, याबाबत आणखी रिसर्च करून बघा. खरं तर साबणामध्ये एवढे बॅक्टेरिया असतात की, तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. साबण शेअर केल्यामुळे हे जर्म्स एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जातात. टॉवेल आपल्यापैकी सर्वांनाच ही गोष्ट माहीत असते, पण तरिही आपण या गोष्टी फॉलो करू शकत नाही. आपला टॉवेल कधीच कोणासोबतही शेअर करू नका. कारण टॉवेलला आपण घाण आणि शरीरावरील ओलावा पुसण्यासाठी वापरतो. ज्यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. (Image Credit : The Independent)टॅग्स :हेल्थ टिप्सब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजीHealth TipsBeauty TipsSkin Care TipsHair Care Tips