Do these 5 things in morning for faster weight loss
वजन कमी करायचंय?; दिवसाची सुरुवात 'या' 5 सवयींपासून करा By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:09 AM2019-08-30T11:09:37+5:302019-08-30T11:14:14+5:30Join usJoin usNext तुम्हाला वजन कमी करायचंय? जर तुमचं उत्तर हो असेल तर मग तुम्ही तुमच्या मॉर्निग रूटिनमध्ये या सवयींचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. या सवयी फक्त वजन कमी करण्यासाठी नाहीतर तुमच्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात. कोमट पाणी सकाळी उठून एक कप कोमट पाणी नक्की प्या. हे फॅट्स बर्न करण्यासोबतच पोट साफ करण्यासाठीही मदत करतं. एवढचं नाहीतर हे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठीही मदत करतं. त्यामुळे ब्लड प्रेशरवर सकारात्मक परिणाम होतात. व्यायाम अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, दिवसभरात कधीही एक्सरसाइज केल्याने जेवढा फायदा होत नाही. तेवढा सकाळी व्यायाम केल्याने होतो. यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे, प्रत्येक व्यक्ती रात्री 6 ते 7 तास झोप घेतो. यादरम्यान आपण काहीही खात नाही. त्यामुळे शरीराने आधीच घेतलेल्या आहारातून मिळालेली पोषक तत्वांचा वापर करून ते बर्न करतं आणि शरीराला एनर्जी देतो. अशातच जर सकाळी व्यायाम केला तर शरीरातील कॅलरीज बर्न होतील. तसेच फॅट्स आणि वजन कमी करण्यास मदत होइल. प्रोटीन आणि फायबरयुक्त ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट म्हणजे दिवसभरातील आपला पहिला आहार असतो. त्यामुळे त्यामध्ये पोषक तत्वांपेक्षा जास्त असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर नाश्त्यामध्ये अशा पदार्थांचा समावेश करा. ज्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतील. यासाठी तुम्ही अंडी, दूध, भिजवलेले नट्स, मोड आलेली कडधान्य किंवा डाळी, ताजी फळं, भाज्या यांसारख्या पदार्थांचं सेवन करू शकता. यातून मिळणारं प्रोटीन स्टॅमिना वाढवून वेट लॉस करण्यासाठी मदत करेल. तसेच फायबर पोट बराच काळ भरल्याप्रमाणे वाटेल. ज्यामुळे भूक कमी लागेल. वजन मोजून नोंद करून ठेवा दररोज सकाळी वजन नक्की करा. यामुळे सर्वात जास्त फायदा होईल की, तुम्हाला वजन कमी होत आहे की, नाही हे समजण्यास मदत होईल. तसेच वर्कआउट प्लॅनमध्येही बदल करता येतील. लंच प्लान ब्रेकफास्ट, एक्सरसाइज आणि इतर कामांतून फ्री झाल्यावर लगेच आपल्या लंचचा प्लॅनही करा. एक संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, ज्या व्यक्ती ऑफिसमध्ये जाताना आपल्यासोबत आपलं लंच घेऊन जातात. त्या व्यक्ती लवकर आपलं वजन कमी करू शकतात. ज्या व्यक्ती लंच घेऊन जात नाहीत. त्या बाहेरून आपलं जेवण ऑर्डर करतात. त्यामुळे त्या अनहेल्दी खातात आणि त्यांचं वजन वाढतं. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सWeight Loss TipsHealth TipsFitness Tips