मैदा खाताय? आतड्यांना आहे धोका, परिणाम आहेत भरपूर गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 01:51 PM2021-07-09T13:51:52+5:302021-07-09T14:09:37+5:30

मैद्याचे अनेक साइड इफेक्ट्स असतात. ते शरीराला अपायकारक असल्याचं समोर आलं आहे. मैदा तयार करण्यालसाठी गव्हाचे पीठ फार बारीक केले जाते. त्यामुळे त्यातील पोषक तत्व पूर्ण नष्ट होऊन जातात. मैद्याचे आणखी काही दुष्परिणाम...

मैद्याचे जास्त आणि वारंवार पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढणं सुरु होतं. अंगी लठ्ठपणा येतो. इतकंच नाही, तर यामुळे कोलेस्टरॉलचं प्रमाणही वाढतं. रक्तातील ट्रायग्ल‌सिराइडलाही यामुळे चालना मिळते. तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असाल, तर मैदा खाणं कायमचं बंद करावं.

मैदा पोटासाठी वाईट असतो. मैद्यात फायबर नसल्यानं पोट नीट साफ होत नाही.

मैद्यात ग्लूटन असतं. ते फूड अॅलर्जी तयार करतं. ग्लूटन जेवणाला लवचिक करून त्याला मऊ टेक्स्चर देतो. त्याचे दुष्परिणाम होतात. तेच गव्हाच्या पिठात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असतं. मैद्यात या दोन्ही बाबी नसतात.

मैदा तयार करताना यातील प्रोटिन काढलं जातं. परिणामी, मैदा अॅसिडिक होतो. त्याचा परिणाम हाडांवर होतो. हाडांतील कॅल्शियम मैदा शोषून घेतो. त्यामुळे हाडं कमकुवत होतात.

रक्तातील साखर वाढते, तेव्हा रक्तात ग्लुकोज गोळा होऊ लागतं. यामुळे शरीरात केमिकल रिअॅक्शन होते आणि कॅटरॅक्टपासून हृदयाचा त्रास ओढावू शकतो.

मैदा नियमित खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. वारंवार आजारी पडण्याची शक्यता बळावते.

मैद्याचा अतिरिक्त वापर हाडांसाठी चांगला नसतो. मैद्यातील ग्लुटन नावाचा घटक हाडांवर विपरीत परिणाम करतो.मैदा करताना त्यातील प्रोटीन काढले जाते त्यामुळे मैदा ऍसिडीक होऊन हाडातील कॅल्शियम शोषून घेतो. यामुळे हाडे ठिसूळ होण्याची शक्यता असते.

शरीर स्वास्थ्याचा पीएच स्तर ७.४ असला पाहिजे. मैद्यामुळे शरीरात अॅसिड तयार होते. यामुळे शरीरात कॅल्शिअमची कमतरता जाणवते. त्यामुळे हाड कमकुवत होतात.

मैदा रक्तातील साखर वाढवतो,यामुळे रक्तात ग्लुकोज गोळा होते यामुके हृदयाचा धोका निर्माण होतो.त्याशिवाय यामुळे ट्राय ग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि यामुळेही हृदयाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

याशिवाय मैद्याच्या अतिरिक्त वापराने अपचन, गॅसेस,मळमळ,पित्त,रक्तदाब,मधुमेह,प्रतिकार शक्ती कमी होणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.