do you feel angry all the time hunger may be the reason know how to get over it
भुकेमुळे राग होतो अनावर?; मग करा हे उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 04:35 PM2018-06-23T16:35:26+5:302018-06-23T16:43:25+5:30Join usJoin usNext प्रत्येक तासाला पाणी प्या : प्रत्येक तासाला पाणी प्यायल्यास पोट भरलेले राहतं आणि शरीरात पाण्याची पातळीदेखील समतोल प्रमाणात राहते. महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यावे. जेवणात दालचीनीचा समावेश करावा : मसल्यांमधील दालचीनी शरीरातील साखरेचं प्रमाण समतोल राखण्याचं प्रयत्न करते. यामुळे पचनक्रिया धीम्या गतीनं होते. शिवाय, यानिमित्तानं आरोग्यास हानिकारक असे पदार्थ खाणंदेखील टाळलं जाऊ शकतं. साखर वर्ज्य करा : साखरेमुळे शरीरातील ऊर्जा ज्या गतीनं वाढते त्या गतीनं ऊर्जा कमीदेखील होते. यामुळे जेव्हा शरीरातील साखरेची पातळी कमी होते, त्यावेळेस झोप येऊ लागते. शिवाय, साखर खाल्ल्यानंतर थोड्या वेळानं भूकदेखील लागते. ज्यूसऐवजी फळांचं सेवन करा : ज्यूसऐवजी फळं खा. फळांमुळे पोट भरलेले राहते. शिवाय ज्यूस करताना अनेकदा त्यात साखर वापरली जाते. साखर शरीरासाठी अपायकारक आहे. साखरेचे शरीरावर दुष्परिणाम होतात. सावकाश जेवण करा : प्रत्येक घास चावून खाल्ल्यास, याचा चांगला फायदा शरीरास मिळते. खाद्यपदार्थांचे पचन योग्य होते आणि पोटाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नHealthHealth Tipsfood