रात्री आंघोळ केल्याने काय होतं? जाणून घ्या असं करणं योग्य की अयोग्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 12:18 PM2024-07-19T12:18:05+5:302024-07-19T13:03:08+5:30

Taking Bath at Night: एक्सपर्टनुसार, रात्री आंघोळ करण्याच्या सवयीमुळे डायजेशन आणि हृदयावर वाईट प्रभाव पडतो.

Taking Bath at Night: काही लोक दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि रात्री आंघोळ करतात. बऱ्याच लोकांना ही सवय असते. दिवसभराचा थकवा आणि शरीरावरील धूळ-माती दूर करण्यासाठी ते रात्री आंघोळ करतात. ही सवय स्वच्छतेच्या दृष्टीने चांगली असली तरी या सवयीने आरोग्याला काही समस्याही होतात. एक्सपर्टनुसार, रात्री आंघोळ करण्याच्या सवयीमुळे डायजेशन आणि हृदयावर वाईट प्रभाव पडतो. अशात तुम्हालाही रात्री आंघोळ करण्याचे नुकसान माहीत असले पाहिजे. तेच जाणून घेऊया...

आरोग्यासंबंधी बऱ्याच समस्या या शरीराच्या तापमानात असंतुलन झाल्याने होतात. रात्री आंघोळ केल्याने शरीराचं तापमान अनियंत्रित होतं. रात्री आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं. ज्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकला ताप अशा समस्या होऊ शकतात. तसेच वेगवेगळ्या अवयवांसंबंधी समस्याही होतात.

रात्री आंघोळ केल्याने जेव्हा शरीराचं तापमान अचानक कमी होतं तेव्हा याचं थेट प्रभाव रक्तप्रवाह आणि हार्ट रेटवर पडतो. यामुळे कार्डियक अरेस्ट आणि हृदयासंबंधी इतर समस्यांचा धोकाही वाढतो. ज्या लोकांना आधीच हृदयासंबंधी समस्या आहेत त्यांनी रात्री आंघोळ करणं टाळलं पाहिजे.

रात्रीची वेळ ही अन्न पचवण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ असते. या वेळ डायजेशन सिस्टीम आपलं काम चांगल्या पद्धतीने करत असतं. पण रात्री आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे डायजेस्टिव सिस्टीम योग्यपणे काम करत नाही.

अनेकदा लोकांना वाटतं की, रात्री जेवण केल्याने झोप चांगली लागते. पण एक्सपर्टनुसार या सवयीमुळे झोपेत खोळंबा होतो. रात्री झोपण्याआधी नर्वस सिस्टम सहज अवस्थेत येऊ लागतं, पण जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा हे नर्वस सिस्टीम जागं होतं आणि झोप येण्याची प्रोसेस योग्यपणे काम करत नाही.

रात्री आंघोळ केल्याने जॉईंट्समध्ये वेदना आणि सूज येण्याची समस्याही होऊ शकते. त्यामुळे जॉईंट्समध्ये वेदना असलेल्या लोकांनी रात्री आंघोळ करण टाळलं पाहिजे.

सायंकाळी घरी आल्यावर स्वच्छतेच्या दृष्टीने आंघोळ करणं चांगलं आहे. अशात तुम्ही रात्री आंघोळ केल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही रात्री जेवण्याच्या आणि झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी आंघोळ करा.