Doctor fauci says it is fine to take vitamins c and d to help boost your immune system
अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:20 PM2020-09-15T15:20:59+5:302020-09-15T15:44:09+5:30Join usJoin usNext अमेरिकेचे प्रमुख संक्रामक रोग विशेषज्ञ डॉक्टर एंथनी फाऊची हे नेहमीच कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत वेगवेगळी माहिती देत असतात. फाऊची यांनी आता शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकन अभिनेत्री जेनिफर गार्नरनं इंस्ट्राग्रावर डॉक्टर फाऊची यांची मुलाखत घेतली होती. या लाईव्ह मुलाखतीदरम्यान फाऊची यांनी व्हिटामीनच्या सप्लिमेंट्स बाबत माहिती दिली आहे. डॉक्टर फाऊची यांनी सांगितले की काही सप्लिमेंट्स रोगप्रतिकारकशक्ती मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर असतात. शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता असल्यास संक्रमण वाढण्याचा धोका असतो. म्हणून डॉक्टराच्या सल्ल्यानं व्हिटामीन्सच्या सप्लीमेंट्स घ्यायला हव्यात. मी स्वतःही या सप्लिमेंट्स घेतो. डॉक्टर फाऊची यांनी व्हिटामीन्सच्या सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला आहे. व्हिटामीन सी एक एंटी ऑक्सिडेंटप्रमाणे काम करतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटामीन सी घेण्यात कोणतीही अडचण नाही. जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्योरिटीचे वरिष्ट स्कॉलर अमेश ए अदलजा यांनी सांगितले की, व्हिटामीन डी श्वसन संक्रमण रोखण्यासाठी फायदेशीर ठरतं याचे कोणतेही पुरावे नाहीत. व्हिटामीन डी एक डायटरी व्हिटामीन आहे. जे नैसर्गिकरित्या अनेक पदार्थांमध्ये असतं. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डाइटरी सप्लीमेंट्स (NIH)च्या मते मासे, अंडी,चीज अशा पदार्थांमध्ये व्हिटामीन डी चं प्रमाण जास्त असतं. हाडांना मजबूती देण्यासाठी , सूज कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी व्हिटामीन डी गुणकारक ठरतं. मेडिकल जर्नल The BMJ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका माहितीनुसार ११ हजार ३२१ लोक प्रत्येक दिवशी व्हिटामीन डी च्या सप्लिमेंट्स घेत होते. या सप्लिमेंट्स न घेणाऱ्यांच्या तुलनेत घेणाऱ्यांमध्ये श्वसन संक्रमणाच्या तक्रारी कमी प्रमाणात दिसून आल्या. ज्या लोकांच्या शरीरात व्हिटामीन डी ची कमरता होती त्यांना या व्हिटामीन्सचा फायदा झाला. संत्री, स्टॉबेरी, ब्रोकोली, टॉमॅटो या पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटामीन डी असते. संशोधनानुसार सर्दी, खोकला असूनही व्हिटामीन्सच्या टॅबलेट्स घेत असलेल्यामध्ये संक्रमणाचा धोका कमी दिसून आला. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटामीन सी आणि व्हिटामीन डी च्या टॅब्लेट्स घ्यायला हव्यात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वयस्कर व्यक्तीने दिवसात १५ mg व्हिटामिन डी आणि महिलांनी ७५ mg व्हिटामीन सी घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तर पुरूषांनी एका दिवसाला 90 mg व्हिटामीन्स घ्यायला हवेत. कोणतीही सप्लिमेंट्स घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या टॅग्स :आरोग्यअमेरिकाHealthAmerica