Does hair grow? Use 7 natural products
केसांची वाढ होत नाही ? वापरा ही 7 नैसर्गिक उत्पादनं By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 06:30 PM2018-02-22T18:30:12+5:302018-02-22T18:42:28+5:30Join usJoin usNext आवळा : हा नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविणारा असून, यात मोठ्या प्रमाणात आवश्यक फॅटी अॅसिड्स असतात. तो केसांची मुळे अधिक शक्तिशाली करून त्यांना ताकद आणि चमक मिळवून देतो. आवळ्यात आयर्न, अँटिआॅक्सिडंट्स (जसे एलॅजिक, गॅलिक अॅसिड) आणि कॅरोटिन असतात. त्यामुळे केसातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे डोक्यावरचा कोंडाही कमी होतो. रोझमेरी : यातील वेदनाशामक घटक असलेल्या कानोसीलमुळे हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे केसांच्या बीजकोषांची वाढ होते आणि केसवाढीला चालना मिळते. केस गळण्याची समस्याही दूर होते. नारळ : केसवाढीला अडथळा आणणा-या फ्री रॅडिकलला रोखले जाऊ शकते. त्याशिवाय केस चमकदार आणि काळेभोर राहण्यासाठी नारळ उपयुक्त ठरतो. जोजोबा - यात शीतज्वर गुणवत्ता असल्यामुळे केसांखालील त्वचेला मऊपणा आणि कोमलता मिळते. त्याशिवाय मृत त्वचा, कोंडा, अस्वच्छतेपासून सुटका करून डोक्याची त्वचा स्वच्छ आणि आर्द्र ठेवतो. जोजोबाची परिणामकारकता प्राचीन काळापासून अवगत असून, याचा वापर जगभरात अनेक औषधांमध्ये केला जातो. लॅव्हेंडर : लॅव्हेंडरमध्ये लिनालूल आणि लिनालिल अँसिटेट असतात. केसांच्या बीजकोषांत ते खोलवर जाऊन एक सुरक्षित उष्ण स्तर तयार करते. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि बीजकोषांच्या वाढीला चांगली चालना प्राप्त होते. ज्युनिपर : हे तेल केसांची मुळे मजबूत करून वाढीला चालना देते. यात असलेल्या जीवाणूविरोधी गुणधर्मामुळे डोक्यावरील त्वचेवर पुरळ तयार करणा-या जीवाणूंची वाढ थांबविते आणि पुरळ रोखते. कॅस्टर : कॅस्टर आॅइल केसांची गळती रोखण्यासाठी वापरले जाते. ते प्रोटिन, मिनरल्स आणि जीवनसत्त्व ‘ई’ने समृद्ध आहे. दुभंगलेल्या केसांसाठीही ते उपयुक्त ठरते. - (अमित सारडा, वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट)