ड्रॅगन फ्रूट-सुपर फ्रूट; खरेच पांढऱ्या पेशी वाढविते का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:26 IST2025-01-31T11:21:05+5:302025-01-31T12:26:36+5:30
Dragon Fruit : डेंग्यू, मलेरिया, कावीळसारख्या विषाणूजन्य आजारांत पांढऱ्या पेशी वाढविण्यासाठी या फळाची अनेकांकडून शिफारस केली जाते.

उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळाची लागवड कर्नाटक, आंध्र, तेलंगणापाठोपाठ महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात होत आहे. डेंग्यू, मलेरिया, कावीळसारख्या विषाणूजन्य आजारांत पांढऱ्या पेशी वाढविण्यासाठी या फळाची अनेकांकडून शिफारस केली जाते.
पेशी वाढविण्यास मदत
पांढऱ्या पेशी वाढवते : काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, ड्रॅगन फ्रूट पांढऱ्या पेशींची संख्या वाढवण्यास मदत करू शकते.
व्हिएतनामच्या फळाचा दर जास्त
व्हिएतनाममध्ये ड्रॅगन फ्रुटची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते आणि तेथील हवामान या फळाच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे व्हिएतनाममधून येणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची गुणवत्ता चांगली असते आणि त्यामुळे त्याचा दर जास्त असतो.
लोकल फळाची गुणवत्ता, दरही कमी
स्थानिक पातळीवर पिकवलेल्या ड्रॅगन फ्रुटची गुणवत्ता आणि दर हे वातावरण, लागवड आणि वाहतूक अशा घटकांवर अवलंबून असतात.
कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन-८ने युक्त
व्हिटॅमिन सी: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते, अॅण्टिऑक्सिडंट्स : शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात, तसेच, ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन-बीदेखील असतात; पण ते कमी प्रमाणात असतात. त्यामुळे या फळांची मागणीही स्थिर असते.
डॉक्टर काय म्हणतात?
आयुर्वेदानुसार, ड्रॅगन फ्रूट पित्तशामक आहे. त्यामुळे ते उष्णता कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. ड्रॅगन फ्रूट एक पौष्टिक आणि चविष्ट फळ आहे. त्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायद्याचे आहे, असे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. उदय कुलकर्णी यांनी सांगितले.