Drink habit: माणसाला दारुचे व्यसन का लागते? संशोधनातून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:34 AM2022-04-02T11:34:52+5:302022-04-02T11:40:10+5:30

why human gets alcohol drink Habits: आपण दररोज अशा घटना ऐकतो. आता याच दारुची नशा का चढते आणि व्यसन कसे लागते याचा खुलासा संशोधनातून झाला आहे.

कोणत्याही प्रकारचे व्यसन हे वाईटच असते. एकदा का व्यसन लागले की ते पाठ सोडत नाही. त्यातून गुन्हे, आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या घटना घडतात. आपण दररोज अशा घटना ऐकतो. आता याच दारुची नशा का चढते आणि व्यसन कसे लागते याचा खुलासा संशोधनातून झाला आहे.

माकडे नेहमी अशा फळांच्या शोधात असतात जी फळे थोडी शिळी झाली असतील किंवा सडली असतील. संशोधनात माकडांनी खाल्लेल्य़ा फळांमध्ये २ टक्के दारूचे अंश उपलब्ध असतात, असे आढळले आहे.

हा अभ्यास Royal Society Open Science च्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. बर्कलीच्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या बायोलॉजिस्ट रॉबर्ट डुडले यांनी २५ वर्षे यावर संशोधन केले आहे. त्यांनी माणसामध्ये दारुविषयीचे प्रेम कसे काय निर्माण होते, यावर हा अभ्यास केला आहे.

२०१४ मध्ये त्यांनी यावर एक पुस्तकही लिहिले आहे. याचे नाव The Drunken Monkey: Why We Drink and Abuse Alcohol आहे. यामध्ये त्यांनी माणसांचे दारूवर असलेले प्रेम हे माकडे आणि लंगुरांची देणगी असल्याचे सूचित केले आहे.

वाइनच्या सुगंधामुळे माकडे आणि लंगूर फळे पिकण्याची वाट पाहतात. त्यांना फळांमध्ये अल्कोहोलचे अंश सापडतात. आता मानवांमध्ये दारूचे प्रेम जाणून घेण्यासाठी एक नवीन अभ्यास करण्यात आला आहे. जे 'ड्रंकन मंकी' या गृहीतकाचे समर्थन करते.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे. त्यांनी पनामामध्ये सापडलेल्या काळ्या हाताच्या कोळी माकडाची खाल्लेली फळे आणि मूत्र यांचे नमुने गोळा केले.

अभ्यासात असे आढळून आले की माकडांना जोबोची काही कुजलेली फळे खायला आवडतात. त्यात अल्कोहोलचे प्रमाण १ ते २ टक्के होते. जे केवळ नैसर्गिक किण्वनातून आले. हे प्रमाण कमी-अल्कोहोल बीअर सारखे आहे. याशिवाय माकडांच्या मूत्रात अल्कोहोलचे अंशही आढळून आले आहेत. यावरून ते ऊर्जेसाठी दारूचा वापर करतात, असा निष्कर्ष काढण्यात आला.

संशोधनात सहभागी असलेल्या क्रिस्टीना कॅम्पबेल म्हणाल्या - मानवासारखी माकडं अल्कोहोलयुक्त फळं खातात हे आम्ही पहिल्यांदाच सिद्ध करू शकलो आहोत. हा फक्त पहिला अभ्यास आहे. यावर अजून काम करण्याची गरज आहे. पण या अभ्यासानंतर असे दिसते की 'ड्रंकन माकड' या गृहीतकात नक्कीच काही तथ्य आहे.

माणसांमध्ये दारू पिण्याची इच्छा माकड खातात ती फळे खाल्ल्याने तर आली नाही ना हे जाणून घेणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे. आणि त्यामुळे त्यांच्या वागण्यात कसा बदल होतो? हे देखील पहायचे आहे.