कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 02:58 PM2020-01-24T14:58:21+5:302020-01-24T15:08:04+5:30

कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण विविध आजारांना नियंत्रण देतं. शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास उच्च रक्तदाब, हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता वाढते.

कोलेस्ट्रॉलचं नियंत्रणात ठेवण्यासाठी अंड्यातला पिवळा भाग (बलक) खाणं टाळा. अंड्याच्या सफेद भागात प्रोटिन असतं. ते शरीरासाठी फायदेशीर असतं.

अनेकांना जंक फूड आवडतं. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भाज्यांमध्ये कमी तेल वापरा.

उकडलेल्या भाजा खाल्ल्यास ते जास्त उत्तम. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील.

चहा, कॉफी, मिल्क शेक प्या. त्यासाठी लो फॅट असलेलं दूध वापरा. क्रीम आणि प्रक्रिया केलेली डेअरी उत्पादनं टाळा.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.