अळूची पाने खा आणि तुमचा हृदयरोग टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:16 PM2023-08-31T12:16:22+5:302023-08-31T12:29:47+5:30

महाराष्ट्रात अळूची पाने विविध खाद्यपदार्थात वापरली जातात.

मुंबई : हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असल्याचे अनेकजण सांगतात. त्यामध्ये अळू पानाची भाजी आरोग्यासाठी हितकारक असून यामध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत.

महाराष्ट्रात अळूची पाने विविध खाद्यपदार्थात वापरली जातात. त्यामध्ये सुद्धा अळूचं फदफदे (भाजी) आणि अळूच्या वड्या हे पदार्थ प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये हा पदार्थ बनविला जातो तसेच काही उपाहारगृहात तो उपलब्ध असतो. आरोग्याच्या विविध व्याधी अळूच्या पानामुळे दूर होतात.

आरोग्याच्या विविध व्याधी अळूच्या पानामुळे दूर होतात. अळूच्या कंदामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्या कारणाने ते हृदय विकासाच्या रुग्णांसाठी उत्तम. कंद उकडून किंवा भाजून खावू शकतो.

अळूच्या पानामध्ये मुबलक प्रमाणात जीवनस्तत्व अ, जीवनस्तत्व क असते जे त्वचेसाठी, डोळ्यांसाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उत्तम आहे.अळूच्या या पानांमध्ये प्रथिनेही असतात. पण, मित्रांनो अळूच्या पानामध्ये जीवनसत्व अ असल्याकारणाने ती तळू नयेत.

पाने शक्य तेव्हा शिजवून खावीत. अळूची भजी खाण्यापेक्षा, पानांना बेसन लावून ती वाफेवर उकडून घ्यावीत आणि त्याच्या वड्या पाडून त्यावर तेल, जिरे टाकून त्यावर वड्या परतवून खाव्या. तसेच अळूच्या पानांचे फदफदेही छान लागते.

अळूची पाने गुणकारी आहेत. त्यामुळे आरोग्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. अनेक रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतात आहार कशा पद्धतीने घ्यावा. त्यावेळी त्यांचा आजार बघून आम्ही त्यांना आहारामध्ये काय घ्यावे हे सांगत असतो. त्यावेळी जर त्या रुग्णाला अळूची पाने आवडत असतील तर आम्ही नक्कीच ती भाजी खाण्याकरिता शिफारस करतो. अळूच्या पानांवर अनेकांनी ते गुणकारी असल्याचे मत आहारतज्ज्ञ शीतल नागरे यांनी व्यक्त केले आहे.