अनेक आजारांना द्याल निमंत्रण जर खाल कच्चं सॅलड, जाणून घ्या धोके... By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 03:12 PM 2021-08-02T15:12:49+5:30 2021-08-02T15:53:59+5:30
अनेकदा लोकं हेल्दी डाएट म्हणून कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर व इतर पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. भाज्या शिजवल्याने त्यातील पोषक नष्ट होतात हे खरं असले ,तरी भाज्या कच्च्या खाण्याचेही दुष्परिणाम असतात... बीटाच्या सेवनाने शरिरात हिमोग्लोबिन वाढतं. बीटाचा वापर सॅलड आणि सँडविचमध्ये केला जातो. काही लोक बीटचा ज्युसदेखील आवडीने पितात. मात्र बीट कच्च खाऊ नये कारण, बीटमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सालेट असतं. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो.
पालक अनेकदा सलॅड म्हणून खाण्यात येतं. कच्चा पालक खाणे धोकादायक ठरू शकतं. पालक शिजवल्यावर त्यात आढळणार्या आयरन आणि मॅग्नेशियम तत्त्वांमध्ये वाढ होते.
गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आढळत ज्याने बॉडी व्हिटॅमिन ए मध्ये कन्वर्ट करते. गाजर शिजवल्यावर कॅरोटीनचे प्रमाण वाढतं. शरीरात पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यात तसेच स्किनला पोषण मिळण्यासाठी ये आवश्यक तत्त्व आहे.
फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली यांचा वापर सॅलडमध्ये केला जातो मात्र या कच्च्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस आणि अपचनसारखे त्रास होतात.
कच्चे वांगी खाण्याचा प्रयत्न करू नये. वांग्यांमध्ये सोलानिन नामक तत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतं. कच्चे वांगी खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या होऊ शकते. म्हणून वांगी शिजवून खावे.
टोमॅटोमध्ये आढळणाऱ्या लाईकोपीनमुळे याचा रंग लाल असतो. लाईकोपीनमुळे प्रोस्टेट कॅन्सर आणि हार्टच्या समस्या दूर राहतात. टोमॅटो शिजवून खाल्ल्याने लाईकोपीन शरीरात जास्त जलद व सहज शोषले जाते.
बटाट्यांमध्ये आढळणारे स्टार्च बटाटे कच्चे खाल्ल्यास पचण्यास कठीण जाते. म्हणून बटाटे उकडून किंवा शिजवून खावेत.
बीन्समध्ये फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, फॉलेट्स, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक तत्त्व आढळतात. बिन्स शिजवून खाल्ल्यास हे सर्व पोषक आपल्याला सहज मिळू शकतात. मधुमेहावर उकळलेले बिन्स उपयोगी ठरतात. तुम्ही बिन्स ५ मिनिटं उकळून त्यावर मीठ आणि मिरपूड घालून खाऊ शकता.
भाज्या कच्च्या असताना त्यामध्ये पोटात न विरघळणारी शुगर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या भाज्या कच्च्या खाण्यापेक्षा वाफवून खाव्यात.
सकाळी न्याहरीमध्ये सॅलड, म्हणजेच कच्च्या भाज्या खाणं घातक ठरू शकतं. भाज्यांमधील फायबर पचायला वेळ लागतो त्यामुळे गॅस, ओटीपोटात दुखणे आणि सूज येऊ शकते.