सावधान! चपातीसाठी मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा वापरताय?; आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 01:02 PM2024-07-14T13:02:25+5:302024-07-14T13:13:16+5:30

फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपातीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. असं खाणं का टाळावं हे जाणून घेऊया.

चपातीसाठी पीठ मळून घेतो आणि जर ते उरलं तर काहीजण फ्रिजमध्ये ठेवतात जेणेकरून नंतर ते वापरू शकतात. पण या पिठापासून बनवलेली चपाती खाणं धोकादायक ठरू शकतं हे तुम्हाला माहीत आहे का?

फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपातीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. असं खाणं का टाळावं हे जाणून घेऊया.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपात्यांमध्ये पोषक घटक कमी असतात. फ्रिजमध्ये जास्त वेळ राहिल्याने पिठातील आवश्यक जीवनसत्त्वे आणि मिनरल्स नष्ट होतात, ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

मळलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात फंगस निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशा पिठापासून बनवलेली चपाती खाल्ल्याने पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारखे पोटाचे आजार होऊ शकतात.

ताज्या पिठापासून बनवलेल्या चपात्यांची चव चांगली असते, तर फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपात्यांची चव फारशी चांगली लागत नाही.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपात्या या पचायला कठीण असतात. यामुळे पोटात गॅस, ॲसिडिटी आणि इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

मळलेल्या पिठात बॅक्टेरिया लवकर वाढतात. पीठ फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवलं तरी त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

नेहमी पीठ मळून लगेच चपात्या बनवा. त्यामुळे पोषक तत्व योग्य प्रमाणात राहतात आणि आरोग्यही चांगले राहते. उरलेले पीठ राहण्याची भीती असल्यास, पीठ कमी प्रमाणात मळून घ्या आणि शक्य तितक्या लवकर वापरा.

पीठ मळताना हात आणि भांडी स्वच्छ ठेवा. यामुळे बॅक्टेरिया आणि फंगसचा धोका कमी होईल. पिठात बॅक्टेरिया आणि फंगसची वाढ होणार नाही म्हणून फ्रिजमध्ये योग्य तापमानात ठेवा. योग्य ती काळजी घ्या.