प्रमाणापेक्षा जास्त लसूण खाल्ल्याने 'या' समस्या उद्भवतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 07:54 PM2019-08-08T19:54:31+5:302019-08-08T20:04:38+5:30

लसूण जेवणाला स्वादिष्ट बनवण्यासोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी याचा औषध म्हणून वापर वर्षानुवर्षे केला जातो. लसणाची एक कळी अनेक आजारांवर रामबाण उपाय सांगितली जाते. मात्र, लसणाचे अनेक फायदे असण्यासोबतच काही समस्या उद्भवू शकतात. लसणाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने काय समस्या होऊ शकतात ते जाणून घेऊया.....

त्वचेचे नुकसान : काही लोक हे चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावतात. पण हे काहींसाठी नुकसानकारक ठरु शकते. काहींसाठी असे हे चांगले असले तरी काहींना यामुळे चेहऱ्यावर जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

सर्जरी : लसणामुळे रक्ताचा संचार अधिक वेगाने होतो. त्यामुळे सर्जरीच्या कमीत कमी दोन आठवड्यांपूर्वी लसणाचे सेवन करु नये. त्यामुळे सर्जरीमध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता असते.

ब्लीडिंग डिसऑर्डर : ताजा लसूण तुमची ब्‍लीडिंगची समस्या वाढवू शकतो. त्यामुळे ब्लीडिंग डिसऑर्डरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लसणाचे सेवन योग्य प्रमाणातच करायला हवे.

पोट आणि पचनक्रियेत समस्या : कशातही मिश्रीत न करता तसाच कच्चा खाल्लेल्या लसणामुळे पोटात दुखणे, भूक कमी लागणे, गॅस, उलटी होणे, पोटात-छातीत जळजळ होणे, डायरिया अशाप्रकारच्या समस्या होऊ शकतात.

हृदयासाठी घातक : अनेक संशोधनानुसार, लसूण खाल्लाने रक्तातील कोलेस्ट्रॉल स्तरात कमतरता आढळली आहे. असेही आढळले आहे की, लसणाच्या अधिक सेवनामुळे हृदय विकाराचा धक्काही आला आहे.