fatty food items which can help you reduce weight
विश्वास ठेवणं अवघड; पण हे चरबीयुक्त पदार्थ घटवतील तुमचं वजन By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 05:37 PM2019-07-15T17:37:31+5:302019-07-15T17:40:23+5:30Join usJoin usNext चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढतं असा अनेकांचा समज असतो. मात्र काही चरबीचं प्रमाण जास्त असलेले काही पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात. तूप- दररोज एक चमचा तूप खाल्ल्यास शरीराला फायदा होतो. तुपामुळे अतिरिक्त फॅट्स बर्न होतात. याशिवाय अन्नपचनाची प्रक्रिया सुरळीत होते. ऑलिव्ह ऑईल- एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये १४ ग्रॅम फॅट असतं. त्यामुळे दररोजच्या जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर फायदेशीर ठरतो. दही- दह्यामध्ये शरीराला फायदेशीर ठरणारे फॅट्स असतात. पचनक्रिया सुधारण्यास, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास दही मदत करतं. अंड- अंड्यामुळे पोट लगेच भरतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं. अक्रोड- दररोज मूठभर अक्रोड खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. याशिवाय हाडांचं आरोग्यदेखील सुधारतं. टॅग्स :हेल्थ टिप्सHealth Tips