खुशखबर! इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 01:16 PM 2020-09-01T13:16:52+5:30 2020-09-01T13:31:56+5:30
जगाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडून आलं आहे की, मानवी शरीरानं कोणत्याही उपचारांशिवय एचआयव्हीवर मात केली आहे. मानवी शरीरातील आजारांशी लढत असलेल्या क्षमतेनं म्हणजेच रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर या व्हायरलला हरवलं आहे.
या घटनेनं संपूर्ण जगभरातील वैज्ञांनिक आणि डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत. एड्स हा आजार झाल्यानंतर मेरपर्यंत व्यक्तीला औषधांचे सेवन करावे लागते. अशा स्थितीतही गंभीर आणि जीवघेण्या व्हायरसवर मात केल्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.
आधीही दोनवेळा लोकांच्या शरीरात बोनमॅरो ट्रांसप्लांट केलं होतं. त्यानंतर शरीरातील HIV व्हायरसमच्या प्रसाराचं प्रमाण कमी झालं होतं. पुन्हा या व्हायरसची लागण झाली नव्हती. पण इम्यून सिस्टीम या जीवघेण्या व्हायरशी लढून नष्ट करण्याची क्षमता ठेवते. असं उदाहरण पहिल्यांदाच समोर आलं आहे.
ही केस समोर आली तेव्हा डॉक्टरांनी शरीरातील अनेक पेशींची तपासणी केली. त्यानंतर या रुग्णाला EC2 नावं देण्यात आलं आहे. ऑगस्टला सायंस मॅग्जिन नेजरमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार हा व्यक्ती HIV नं संक्रमित झाल्यानंतर आपोआप बरा झाला आहे.
दुसऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली. या व्यक्तीला EC1 असं नाव देण्यात आलं आहे. शरीरातील पेशींची तपासणी केल्यानंतर शरीरात फक्त एक व्हायरस दिसून आला तोही जेनेटिकली निष्क्रीय होता. या दोन्ही माणसांच्या शरीरातील समान घटक म्हणजे व्हायरसला निष्क्रिय करण्याची क्षमता त्यांच्यात होती.
तपासणीनंतर डॉक्टरांनी एलीट कंट्रोलर्स असं नाव दिलं आहे. एलीट कंट्रोलर्स म्हणजे शरीरातील एचआयव्ही व्हायरस पूर्णपणे निष्क्रीय झालेला असतो किंवा औषधं न घेताही या व्हायरसला बरं करता येऊ शकतं. याशिवाय व्हायरसचा शरीरात प्रवेश झाल्यानं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधक सत्या दांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांनंतर किंवा वर्षांनी नाही तर दीर्घकाळानंतर विकसीत होणारी इम्यून सिस्टिम या केसमध्ये दिसून आली आहे. जगभरातील एकूण ३ कोटी ५० हजार लोक HIV नं संक्रमित आहेत. त्यात ९९.५० टक्के रुग्णांना रोज एंटीरेट्रोवायरल औषधं म्हणेच HIV चे औषध घ्यावे लागते. अनेकदा औषधं न घेताही या व्हायरसवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. हे या केसमधून दिसून आलं आहे.
या दोघांच्या शरीरात एचआयव्ही व्हायरस कमकुवत असण्याची शक्यता आहे. ६४ एलिट कंट्रोलर्सवर अभ्यास केला होता. त्यातील ४१ लोक हे एंटीरेट्रोवायरल औषध घेत होते. पण EC2 यांनी कोणतंही औषधं न घेता शरीरातील व्हायरल निष्क्रिय झाला आहे.