first zika virus case detected in pune maharashtra know symptoms and precautionary measures
राज्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला; कसा कराल बचाव, काय आहेत लक्षणं; जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 02:29 PM2021-08-01T14:29:15+5:302021-08-01T14:31:55+5:30Join usJoin usNext Zika Virus: पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला; महिलेला लागण केरळमध्ये वेगानं पसरलेल्या झिका विषाणूनं आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुण्यात काल झिकाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. पुण्यातल्या पुरंदरमध्ये एका ५० वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली. तिची चिकनगुनिया चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत देशात केवळ केरळमध्येच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली होती. केरळमध्ये आतापर्यंत ६३ झिकाबाधित आढळून आले आहेत. आता झिकानं महाराष्ट्रातही एंट्री घेतली आहे. त्यामुळे कोरोना संकटात चिंता वाढली आहे. झिका विषाणू एडीस इजिप्ती डासामुळे पसरतो. याच डासामुळे डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार पसरतात. झिकाचा विषाणू आईच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळांमध्ये पसरतो. रक्त संक्रमणाच्या माध्यमातून आणि शरीर संबंधांच्या माध्यमातूनही झिका विषाणू पसरतो. झिकाच्या रुग्णांना लगेच ओळखणं अवघड असतं. कारण झिकाच्या लक्षणाची नेमकी व्याख्या अद्याप समोर आलेली नाही. एडिस इजिप्ती डास चावल्यानंतर साधारणत: ३ ते १२ दिवसांत झिकाची लागण होते. एडीस इजिप्ती डास चावलेल्यांपैकी ४ पैकी ३ जणांना झिकाची बाधा होते. त्यांना तीव्र ताप, डोकेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास जाणवतो. झिकामुळे मायक्रोसेफली नावाच्या आजाराचा धोका निर्माण होतो. हा आजार न्युरोलॉजिकल स्वरुपाचा आहे. यामुळे मुलांचं डोकं लहानच राहतं. मेंदूचा पूर्ण विकास होत नाही. मायक्रोसेफली आजार लहान मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यांना आयुष्यभर मेंदूशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. झिका विषाणूपासून बचाव करण्यासाठी आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. किटकनाशकांचा वापर करावा. सजगता बाळगल्यास झिकाची लागण टाळता येभ शकते. डास चावू नये यासाठी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करण्याचा आणि खिडक्या, दरवाज्या बंद ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात.टॅग्स :झिका वायरसकोरोना वायरस बातम्याZika Viruscorona virus